क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म 'Zepto' ने 2025 चा आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात एका अशा 'दिलदार' ग्राहकाची माहिती दिली आहे, ज्याने माणुसकीचं एक अनोखं उदाहरण जगासमोर ठेवलंय.
एका टिपने बदललं नशीब
सामान्यतः एखाद्या डिलिव्हरीसाठी आपण किती टिप देतो? 10.20 रुपये, जास्तीत जास्त 50, 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त 500 रुपये. पण गुरुग्राममधील प्रियांशु नावाच्या एका ग्राहकाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. प्रियांशुने आपल्या डिलिव्हरी पार्टनरला चक्क 54,000 रुपयांची टिप दिली आहे.
advertisement
एका साध्या डिलिव्हरीसाठी इतकी मोठी रक्कम टिप म्हणून मिळणं, हे त्या डिलिव्हरी बॉयसाठी एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नव्हतं. या घटनेची चर्चा आता देशभर होत असून, प्रियांशुला 'Zepto' चा सर्वात दिलदार कस्टमर म्हटलं जात आहे.
2025 चे 'झॅप्टो' मधील इतर अजब विक्रम
प्रियांशुच्या या दिलदारपणासोबतच 2025 मध्ये भारतीय ग्राहकांनी इतरही अनेक भन्नाट गोष्टी केल्या आहेत:
मुंबईत राहणाऱ्या यासिन नावाच्या व्यक्तीने एकाच वेळी 1,89,900 रुपयांची ऑर्डर दिली. किराणा सामानाची इतकी मोठी ऑर्डर पाहून झॅप्टोचे कर्मचारीही थक्क झाले होते.
राजकुमार एल. नावाच्या एका ग्राहकाने वर्षाभरात तब्बल 5,894 वेळा ऑर्डर दिली. म्हणजे दिवसाला सरासरी 16 वेळा त्याने झॅप्टो ॲपचा वापर केला. तंत्रज्ञानाच्या जोरावर यंदाची सर्वात वेगवान डिलिव्हरी अवघ्या 48 सेकंदात पूर्ण करण्यात आली.
या अहवालातून शहरांनुसार भारतीयांच्या बदलत्या सवयीही समोर आल्या आहेत:
1. बेंगळुरू: इथल्या टेक-सॅव्ही लोकांनी बॅटरी संपल्यावर चक्क 69,177 टाइप-सी केबल्स ऑर्डर केल्या.
2. हैदराबाद: इथल्या 65,105 किलो उस्मानिया बिस्किटांची विक्री झाली, तर अनेक लोकांनी 'शुगर-फ्री' पदार्थांसोबत 'मिठाई' ऑर्डर करून डाएटला कल्टी दिली.
3. दिल्ली: उत्तर दिल्लीला 'पेरू' आवडला, तर दक्षिण दिल्लीच्या लोकांची पसंती 'एव्होकॅडो'ला होती.
आजच्या 'इन्स्टंट' युगात जिथे प्रत्येक सेकंदाला महत्त्व आहे, तिथे प्रियांशुसारख्या ग्राहकाने दिलेली ही टिप केवळ पैसा नाही, तर त्या डिलिव्हरी पार्टनरच्या कष्टाचा केलेला सन्मान आहे. 10 मिनिटांच्या या सेवेने केवळ सामान घरापर्यंत पोहोचवलं नाही, तर अशा अनेक भावनिक गोष्टींनाही जन्म दिला आहे.
