Ank Jyotish: मूलांक 1, 2, 4 ला भाग्याची साथ; बिकट परिस्थिती कोणाच्या वाट्याला? दैनिक अंक ज्योतिष
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 08 फेब्रुवारी 2026 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
अंक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक)
भविष्यातील प्लॅनिंग करण्यासाठी आजचा दिवस एकदम भारी आहे. आज तुम्ही मजेत आणि बिनधास्त मूडमध्ये असाल. घर किंवा जागा खरेदीचे व्यवहार फायनल करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. नशिबाची साथ लाभेल, पण वैयक्तिक आयुष्यात असे काहीही करू नका ज्याचा नंतर पश्चाताप होईल.
भाग्यशाली अंक: 18
भाग्यशाली रंग: केशर
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
तुमचे मित्र आणि नातेवाईक तुम्हाला मदत करण्यासाठी खूप उत्सुक असतील. आज तुम्हाला बाहेर जेवायला जायची इच्छा होईल. नवीन घर घेण्याचा विचार असेल तर पुढे जा. खर्च जास्त होणार आहेत आणि परतावा थोडा कमी मिळेल. जोडीदाराला वेळ द्या आणि तुमचे नाते जपण्याचा प्रयत्न करा.
भाग्यशाली अंक: 8
भाग्यशाली रंग: पांढरा
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
भावंडांमधील चुरस तुमच्या चिंतेचे कारण ठरू शकते, ज्यामुळे तुम्ही तणावात राहाल. आज तुमच्या आईला तुमच्या मदतीची गरज पडू शकते. बेसावध राहिलात तर मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर बचतीला हात लावावा लागेल. नात्यात अधिक स्पष्टता आणि जवळीक हवी असेल तर संवाद साधा.
भाग्यशाली अंक: 9
भाग्यशाली रंग: गुलाबी
advertisement
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
सध्या तुमची स्थिती मजबूत आहे आणि तुमच्या हातात भरपूर अधिकार असतील. घरासाठी वस्तूंची खरेदी केल्याने तुमचा मूड सुधारेल. तब्येतीच्या बाबतीत तुम्ही आज फिट अनुभवाल; नवीन व्यायाम सुरू करण्यासाठी हीच वेळ आहे. परदेशी कंपन्यांकडून फायदा होऊ शकतो. जोडीदारासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
advertisement
भाग्यशाली अंक: 1
भाग्यशाली रंग: मरून
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
अधिकार पदावरील व्यक्तींच्या मदतीने तुमच्या करिअरला गती मिळेल. तुम्हाला हवी असलेली माहिती किंवा ज्ञान आज मिळू शकेल. तब्येत थोडी नरम-गरम असू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. व्यवसायाची रणनीती सुधारण्यासाठी नवीन प्रयोग करून पहा. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल.
advertisement
भाग्यशाली अंक: 15
भाग्यशाली रंग: गडद हिरवा
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
आज वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कोणीतरी फसवणूक करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. उत्पन्न वाढण्याचे योग असल्यामुळे घरगुती खर्चाचे टेन्शन येणार नाही. तुमच्या नात्यात त्रयस्थ व्यक्ती लुडबूड करण्याची शक्यता आहे, त्वरित लक्ष द्या.
advertisement
भाग्यशाली अंक: 7
भाग्यशाली रंग: रॉयल ब्लू
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
कोर्ट-कचेरीची कामे किंवा कायदेशीर वाद मानसिक त्रास देऊ शकतात. शॉपिंग केल्यामुळे थोडा विरंगुळा मिळेल. तुमची आंतरिक ताकद तुम्हाला कामाच्या ठिकाणच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करेल. रागावर ताबा ठेवा, नाहीतर नात्यात वितुष्ट येऊ शकते.
भाग्यशाली अंक: 6
भाग्यशाली रंग: कॉफी
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)
कोणत्याही माहितीची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आईला तुमच्या मदतीची गरज लागेल. तुम्ही मनातील गोष्ट साध्य करू शकाल, पण पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. नुकत्याच ओळख झालेल्या व्यक्तीसोबत डेटवर जाण्यापूर्वी दोनदा विचार करा.
भाग्यशाली अंक: 4
भाग्यशाली रंग: जांभळा
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
घरातील वादांना तुमचा स्वभाव कारणीभूत ठरू शकतो, त्यावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शाळेची चांगली बातमी मिळेल. आज शारीरिक इजा, विशेषतः डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात स्पर्धकांना हरवण्यासाठी तुम्ही जिद्दीने काम कराल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.
भाग्यशाली अंक: 2
भाग्यशाली रंग: इंडिगो
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 6:40 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ank Jyotish: मूलांक 1, 2, 4 ला भाग्याची साथ; बिकट परिस्थिती कोणाच्या वाट्याला? दैनिक अंक ज्योतिष







