advertisement

बुध करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, दोन दिवसांनी 'या' 3 राशींना सोसावे लागणार हाल; आयुष्यात होणार उलथापालथ!

Last Updated:

द्रिक पंचांगानुसार, 10 मार्च 2026 रोजी बुध पूर्वभाद्रपद नक्षत्र सोडून राहूच्या अधिपत्याखाली असलेल्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह आपली स्थिती सातत्याने बदलत असतो.

News18
News18
Budh Nakshatra Parivartan 2026 : द्रिक पंचांगानुसार, 10 मार्च 2026 रोजी बुध पूर्वभाद्रपद नक्षत्र सोडून राहूच्या अधिपत्याखाली असलेल्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह आपली स्थिती सातत्याने बदलत असतो. 10 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी बुध ग्रह राहूच्या अधिपत्याखाली असलेल्या 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहू हा भ्रम, अनपेक्षित बदल आणि गोंधळाचा कारक मानला जातो, तर बुध हा बुद्धी आणि संवादाचा कारक आहे. जेव्हा हे दोन ग्रह नक्षत्र रूपाने एकत्र येतात, तेव्हा विचार आणि निर्णयांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असते. विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो.
कर्क - मानसिक अस्वस्थता आणि भ्रम
कर्क राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन मानसिक ताण वाढवणारे ठरू शकते. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला निर्णय घेताना गोंधळ जाणवेल. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. जवळच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संवाद साधताना गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा.
advertisement
कन्या - कामात अडथळे आणि आरोग्य
कन्या राशीचा स्वामी बुध असला तरी, तो राहूच्या नक्षत्रात जात असल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. विनाकारण प्रवास करावा लागल्याने शारीरिक थकवा जाणवेल. नवीन गुंतवणुकीसाठी 10 मार्चनंतरचा काळ टाळलेलाच बरा.
मीन - आर्थिक नुकसान आणि वाद
मीन राशीत आधीच अनेक ग्रहांची हालचाल सुरू आहे. बुधाचे हे गोचर तुमच्या खर्चात अचानक वाढ करू शकते. व्यापार करणाऱ्यांनी मोठी 'डीलिंग' करताना सर्व कागदपत्रे नीट तपासावीत. जोडीदाराशी असलेल्या मतभेदामुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा सट्टेबाजीपासून या काळात दूर राहणेच हिताचे ठरेल.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
बुध करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, दोन दिवसांनी 'या' 3 राशींना सोसावे लागणार हाल; आयुष्यात होणार उलथापालथ!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement