Chandra Grahan 2025: येत्या 7 सप्टेंबरला वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, कुणाचं नशीब चमकणार, कुणाला धोका?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Chandra Grahan 2025: सन 2025 मधील शेवटचं चंद्रग्रहण येत्या 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या काही राशींचं नशीब चमकवणार आहे. तर काहींना काळजी घ्यावी लागेल.
पुणे : यंदाच्या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. हे ग्रहण भारतातूनही दिसणार आहे. चंद्रग्रहण नेमके कधी सुरू होणार आणि कधी संपणा?, त्याचा कोणत्या राशींवर प्रभाव पडणार आहे?, तसेच त्या राशीच्या व्यक्तींनी कोणते नियम पाळायला हवेत आणि कोणती काळजी घ्यावी? याबाबत ज्योतिषी शंकर पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
चंद्रग्रहणाची नेमकी वेळ काय ?
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कुंभ राशीत होईल. हे ग्रहण भारतात दिसणार असून 7 सप्टेंबर रोजी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि पहाटे 1.26 वाजता संपेल.
या राशींना ग्रहणाचा धोका
कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना या ग्रहणाचा अनिष्ट परिणाम भोगावा लागू शकतो. ज्योतिषी शंकर पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या राशीच्या व्यक्तींनी तसेच गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे टाळावे. ग्रहणकाळात कोणतेही महत्त्वाचे काम करू नये, शांतता राखावी, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास टाळावा. तसेच नदी, स्मशानभूमी अशा ठिकाणी जाणे टाळावे आणि ग्रहणाच्या वेळी शिजवलेले अन्न खाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
ग्रहणाच्या काळात या राशींचं नशीब खुलणार
मेष राशी – अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना फायदा, आरोग्यात सुधारणा.
मिथुन राशी – अडकलेले पैसे मिळतील, बँक बॅलन्स वाढेल, गुंतवणुकीवर परतावा.
कन्या राशी – महत्त्वाच्या प्रकरणात यश, सुखसोयींमध्ये वाढ, विरोधकांवर मात.
वृश्चिक राशी – धन-समृद्धी, घर-वाहन खरेदीची संधी, अडथळे दूर होतील.
धनु राशी – नोकरीत प्रगती, मान-सन्मान आणि पैसा, भावंडांशी नातं घट्ट.
advertisement
ज्योतिषी शंकर पाटील यांनी सांगितल्यानुसार ग्रहण काळात योग्य काळजी घेतल्यास तुम्ही सुरक्षित राहाल आणि या काळाचा लाभ देखील घेऊ शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 31, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chandra Grahan 2025: येत्या 7 सप्टेंबरला वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, कुणाचं नशीब चमकणार, कुणाला धोका?