कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या आजाराचा धोका? ऍस्ट्रोलॉजिस्टने सांगितलं अचूक उत्तर आणि उपाय
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये केवळ नशीब किंवा करिअरच नाही, तर आरोग्याचाही सखोल विचार केला जातो. कुंडलीतील 12 राशी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा एखादा ग्रह अशुभ स्थितीत असतो, तेव्हा त्या राशीच्या व्यक्तीला विशिष्ट आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Astrology News : ज्योतिषशास्त्रामध्ये केवळ नशीब किंवा करिअरच नाही, तर आरोग्याचाही सखोल विचार केला जातो. कुंडलीतील 12 राशी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा एखादा ग्रह अशुभ स्थितीत असतो, तेव्हा त्या राशीच्या व्यक्तीला विशिष्ट आजारांचा सामना करावा लागू शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या राशीनुसार संभाव्य आजार जाणून घेतल्यास आपण वेळीच काळजी घेऊ शकतो.
मेष (Aries): मेष राशीचा अंमल डोक्यावर असतो. या व्यक्तींना डोकेदुखी, मायग्रेन आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
उपाय: दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि आहारात गुळाचा वापर करा.
वृषभ (Taurus): या राशीचा संबंध घसा आणि मानेशी असतो. यांना थायरॉईड, टॉन्सिल्स आणि घशाचे विकार होण्याची शक्यता असते.
उपाय: शुक्रवारी साखर किंवा तांदूळ दान करा आणि पांढरे सुगंधी अत्तर वापरा.
advertisement
मिथुन (Gemini): मिथुन राशीचा प्रभाव खांदे, फुफ्फुसे आणि हातावर असतो. यांना दमा, श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थेचे आजार होऊ शकतात.
उपाय: बुधवारी गायीला हिरवा चारा द्या आणि 'ओम बुं बुधाय नमः' चा जप करा.
कर्क (Cancer): या राशीचा संबंध छाती आणि पोटाशी असतो. यांना पचनाचे विकार, कफ आणि मानसिक तणावाचा त्रास होऊ शकतो.
advertisement
उपाय: सोमवारी महादेवाला अभिषेक करा आणि चांदीच्या पात्रात पाणी प्या.
सिंह (Leo): सिंह राशीचा अंमल हृदयावर आणि पाठीवर असतो. यांना हृदयविकार आणि पाठीच्या कण्याचे आजार होण्याची शक्यता असते.
उपाय: दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे वाचन करा.
कन्या (Virgo): या राशीचा संबंध पोटाच्या खालच्या भागाशी आणि आतड्यांशी असतो. यांना बद्धकोष्ठता, अल्सर आणि फूड ॲलर्जीचा त्रास होतो.
advertisement
उपाय: गरिबांना हिरव्या पालेभाज्या दान करा आणि पक्ष्यांना दाणे टाका.
तूळ (Libra): तूळ राशीचा संबंध किडनी आणि कंबरेच्या भागाशी असतो. यांना किडनी स्टोन आणि त्वचेचे आजार होऊ शकतात.
उपाय: कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि स्त्री शक्तीचा आदर करा.
वृश्चिक (Scorpio): या राशीचा संबंध गुप्तेंद्रियांशी असतो. यांना मूळव्याध आणि रक्तदोष होण्याची शक्यता असते.
advertisement
उपाय: मंगळवारी मसूर डाळ दान करा आणि कपाळावर शेंदराचा टिळा लावा.
धनु (Sagittarius): धनु राशीचा प्रभाव मांड्या आणि यकृतावर असतो. यांना यकृताचे आजार आणि सायटिकाचा त्रास होऊ शकतो.
उपाय: दर गुरुवारी कपाळावर हळदीचा टिळा लावा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा.
मकर (Capricorn): मकर राशीचा संबंध गुडघे आणि हाडांशी असतो. यांना सांधेदुखी आणि दातदुखीचा त्रास वारंवार होतो.
advertisement
उपाय: शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
कुंभ (Aquarius): या राशीचा प्रभाव पायाच्या घोट्यांवर आणि रक्ताभिसरणावर असतो. यांना व्हेरिकोज वेन्स आणि पायांना सूज येणे असे त्रास होतात.
उपाय: दिव्यांग व्यक्तींना मदत करा आणि 'ओम शं शनैश्चराय नमः' जप करा.
मीन (Pisces): मीन राशीचा संबंध तळपायांवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर असतो. यांना निद्रानाश आणि पायांचे विकार होण्याची शक्यता असते.
advertisement
उपाय: गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि पिवळा रुमाल सोबत ठेवा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 12:42 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या आजाराचा धोका? ऍस्ट्रोलॉजिस्टने सांगितलं अचूक उत्तर आणि उपाय











