Makar Sankranti Horoscope: मकर संक्रातीला प्रेम फुलणार! या 5 राशींच्या जीवनात आनंद परतणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Makar Sankranti Love Horoscope, 13 January 2025: जीवनात प्रेम महत्त्वाचे आहे. प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदार हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यासोबतचे आपले संबंध कसे राहतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 14 जानेवारी 2025 लव्ह राशीफळ जाणून घेऊ.
मेष : तुम्ही रिलेशनशिपमध्ये आनंदी आहात; पण कदाचित तुम्ही किंवा तुमचा जोडीदार खूप व्यग्र असू शकाल. त्यामुळे दोघांपैकी कोणा एका आपण दुसऱ्याकडून दुर्लक्षित होत आहोत असं वाटू शकेल. त्यामुळे जोडीदाराचं प्रेम मिस करताय असं वाटू शकेल.
वृषभ : आज तुम्हाला इतर सगळ्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊन फक्त जोडीदारासमवेत काही रोमँटिक वेळ व्यतीत करायचा आहे. रोजच्या रूटीनपेक्षा वेगळं काही म्हणजे दुपारी चित्रपट पाहण्याचा किंवा रोमँटिक डिनरचा विचार तुम्ही कराल; मात्र कदाचित तसं होऊ शकणार नाही.
मिथुन : तुम्हाला काय वाटतंय ते जोडीदाराला सांगण्यासाठी वेळ काढा. काही जखमा झाल्या असल्या, तर त्या तुमचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे बऱ्या होऊ शकतात. हा तात्पुरती, छोटी कठीण काळ लवकरच जाईल. या वेळी तुमचे आवेग आणि इच्छा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. दीर्घकालीन रिलेशनशिपमध्ये परिवर्तित होणार नाही, अशा शॉर्ट-टर्म रिलेशनशिपमध्ये गुंतणं योग्य राहणार नाही.
advertisement
कर्क : तुमचं प्रेमजीवन शारीरिक आकर्षणापेक्षाही अधिक काही तरी असावं असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला असं वाटतंय, की काही वरवरच्या कारणांसाठी जोडीदार तुम्हाला वापरतोय. तसंच, तुमची जशी भावनिक गुंतवणूक या नात्यात आहे तेवढी त्यांची नाही, असंही तुम्हाला वाटेल. तुम्ही दोघंही एकाच परिस्थितीत आहात. त्यामुळे आजचा दिवस त्या साऱ्या तक्रारी दूर करण्याचा आहे.
advertisement
सिंह : आजचा दिवस प्रेमजीवनासाठी आनंददायी आहे. जोडीदारासोबत कुठे तरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता. दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या मनात काही शंका असू शकतील; मात्र अखेरीस आनंद आणि समृद्धीचा शुभ योग येईल. प्रेमजीवनात जितका अधिक संयम राखाल, तितकं ते दिवसाच्या अखेरीला रिलॅक्स असेल.
कन्या : भावना नियंत्रणात ठेवा. तुम्हाला सोडण्यामध्ये जोडीदाराचा दोष आहे असं गृहीत धरू नका. तुमची फ्रस्ट्रेशन्स तुम्ही त्यांच्यावर लादता आहात आणि तसंच उलट होत आहे. तुमच्या दोघांपैकी एक कोणी तरी जास्त ताणाखाली किंवा दमलेला आहे. त्यामुळे अश्रू किंवा राग यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. ब्लेम गेम अर्थात दोष देण्याचा उद्योग सुरू होण्याआधीच थांबवा. त्याउलट दोघांनी एकत्र अधिक प्रेमाचा वेळ व्यतीत करा.
advertisement
तूळ : तुम्ही प्रेम, समजूतदारपणा आणि कौतुकासाठी तळमळत आहात; मात्र कदाचित विचारण्यासाठी तुम्हाला खूपच अभिमान वाटत असावा. दुर्दैवाने तुमचा जोडीदार आज खूप व्यग्र असेल. काही काळासाठी गोष्टी सोडून द्या. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता हे विसरू नका.
advertisement
वृश्चिक : रोमान्सच्या मूडमध्ये असाल. हा मूड दिवसभर मजबूत राहील. आवेगपूर्ण वागण्यापेक्षा सावध राहा. आवेगपूर्ण वागण्यामुळे एखादी सुरू असलेली रिलेशनशिप बिघण्याची शक्यता असेल, तर आवेगाचा विचारही करू नका. असं काही घडलं, तर त्यातून किती दुखावलं जाऊ शकेल याचा सर्वांगीण विचार करा.
धनू : प्रेमजीवनात सुखद अनुभव असतील. परस्परांबद्दलचं प्रेम दृढ होईल. प्रेमजीवनात काही नावीन्य आणलंत, तर आनंद आणि समृद्धी येईल. दिवसाच्या अखेरीला एखाद्या विषयावर दोघांचंही टेन्शन वाढेल; पण हळूहळू रोमान्सही येईल. जीवनात आनंद आणि सलोखा मिळेल. परस्परांबद्दलचं प्रेम वृद्धिंगत होईल. आजचा दिवस प्रेमजीवनासाठी अनुकूल आहे.
advertisement
मकर : लव्ह रिलेशनशिपसाठी दिवस शुभ आहे. कष्टांतून जीवनात मोठं यश मिळवलेल्या व्यक्तीचं पाठबळ तुम्हाला प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी लाभेल. दिवसाच्या अखेरीला वेळ अनुकूल असेल. परस्परांबद्दलचं प्रेम तीव्र होईल. आज नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वरवरचं नातं नको असलं, तर तुम्ही अशा नात्यात नाही आहात ना, याची खात्री करा.
कुंभ : लव्ह रिलेशनशिप्सच्या बाबतीत मन दुःखी राहू शकतं. सुरुवातीला काही बातमी मिळाल्यामुळे भावनिकदृष्ट्या अस्थिर होऊ शकतं; मात्र दिवसाच्या अखेरीला शुभ परिस्थिती तयार होईल आणि परस्परांबद्दलचं प्रेम वाढेल. जोडीदारासमवेत रोमँटिक वेळ व्यतीत करू शकाल. दोघांनी मिळून जो विचार कराल, तो पूर्ण होईल. आर्थिक बाबी आणि भावना या बाबी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत.
advertisement
मीन : आज जोडीदाराची काळजी घेण्यासाठी, त्याला पाठबळ देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घ्याल. हे खूप मोठं काम आहे. तुम्ही काही आर्थिक समस्या दूर कराल असं समजून ही व्यक्ती तुलनेने अधिक मागणी करील. हे तुम्हाला भावनिकदृष्ट्या अस्थिर करणारं असेल. तुम्ही पूर्वी थोडे पॅनिक झाला असलात, तर आज तुम्हाला पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 14, 2025 9:47 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Makar Sankranti Horoscope: मकर संक्रातीला प्रेम फुलणार! या 5 राशींच्या जीवनात आनंद परतणार