Shravan: श्रावणात महिला हिरव्या रंगाच्या साड्या-कपडे का वापरतात? धार्मिक महत्त्व माहीत आहे का
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Spiritual Significance Of Green Color In Shrawan: श्रावणात शिवभक्त अगदी भक्तीभावनं महादेवाची विशेष पूजा-उपवास करतात. या महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यानं विवाहित महिलांना अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. यंदा श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होणार आहे.
मुंबई : श्रावण महिना हा शंकराच्या भक्तीसाठी समर्पित आहे. श्रावणात शिवभक्त अगदी भक्तीभावनं महादेवाची विशेष पूजा-उपवास करतात. या महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यानं विवाहित महिलांना अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. यंदा श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होणार आहे. या काळात हिरव्या रंगाला विशेष महत्त्व असते. या महिन्यात महिला हिरवे कपडे- हिरव्या बांगड्या घालतात. श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे महत्त्व काय आहे, तुम्हाला माहिती आहे का?
श्रावणात हिरवा रंग का खास असतो?
श्रावण महिन्यात निसर्ग आपल्या पूर्ण सौंदर्यात दिसतो. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. हिरवा रंग या हिरवळीचे प्रतीक मानला जातो. भगवान शंकराला हिरवळ आवडते आणि त्यांना नैसर्गिक वातावरणात राहायला आवडते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळेच या महिन्यात हिरवे कपडे घालणे हे शिवभक्तीशी संबंधित प्रतीक बनले आहे.
महिला हिरव्या बांगड्या का घालतात?
भारतीय संस्कृतीत बांगड्या सुहागाचे प्रतीक मानल्या जातात. विशेषतः श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या घालण्याची परंपरा आहे, कारण हिरवा रंग हा सौभाग्य आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या काळात महिला हिरव्या बांगड्या घालतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख आणि शांतीसाठी प्रार्थना करतात.
advertisement
ज्योतिषशास्त्रात हिरव्या रंगाचे महत्त्व काय आहे?
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे, तो बुद्धिमत्ता, संवाद क्षमता आणि संतुलनाचे प्रतीक आहे. श्रावणामध्ये हिरवा रंग परिधान केल्याने बुधाची सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे मानसिक स्थिरता आणि समज वाढते.
advertisement
हिरव्या रंगाचे मानसिक फायदे -
मानसिक दृष्टिकोनातून हिरवा रंग मनाला शांती देतो आणि तणाव कमी होतो. त्यानं आत्मविश्वास वाढतो आणि सर्जनशील विचारांना चालना देतो. श्रावणात हिरवा रंग परिधान करणं फक्त धार्मिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या देखील फायदेशीर मानले जाते.
श्रावण हा फक्त धार्मिक महिना नाही तर निसर्ग, श्रद्धा आणि मानसिक संतुलनाचा संगम देखील आहे. या काळात हिरव्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या घालणे ही केवळ एक परंपरा नाही तर शिवभक्तीची, निसर्गाशी असलेल्या संबंधाची आणि जीवनात मंगल आणण्याची एक सुंदर अभिव्यक्ती आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2025 1:55 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan: श्रावणात महिला हिरव्या रंगाच्या साड्या-कपडे का वापरतात? धार्मिक महत्त्व माहीत आहे का