Numerology: 2025 मध्ये अनपेक्षित घटनांनाचे आव्हान; 3, 12, 21 आणि 30 जन्मतारीख तुमची तर नाही ना?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Numerology 2025: आगामी वर्ष 2025 ची चाहुल लागली आहे. हे वर्ष आपल्यासाठी कसं असेल? हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. अंकज्योतिष शास्त्राच्या माध्यातून याबाबत जाणून घेऊ.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : मानवी जीवनात अंकांना खूप महत्त्व असून अनेकांचा अंक ज्योतिषशास्त्रावर देखील विश्वास असतो. अंकशास्त्र हे प्रत्येक संख्येशी जोडलेल्या अर्थाभोवती फिरत असतं. अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन देखील करता येतं. 3, 12, 21 आणि 30 या तारखेल्या जन्मलेल्यांचा मूलांक किंवा शुभांक हा 3 असतो. आता अनेकांना येणारं नवीन वर्ष 2025 हे आपल्या मूलांकासाठी कसं असणार हे जाणून घ्यायचं असतं. कोल्हापूर येथील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी लोकल18 सोबत बोलताना 3 या मूलांकासाठी येणारं नवीन वर्ष कसं असणार? हे सांगितलंय.
advertisement
3 मूलांक कुणाचा?
ज्या व्यक्तींची जन्मतारीख 3, 12, 21, 30 आहे अशा सर्वांचा मूलांक किंवा शुभांक 3 असतो. 3 हा अंक अंकशास्त्राच्या दृष्टीने गुरुच्या प्रभावाखालील असल्याने या अंकाचा स्वामीग्रह गुरु हा आहे. 2025 हे वर्ष मंगळाचे वर्ष म्हणून ओळखले गेलेले आहे. कारण या वर्षाची संपूर्ण बेरीज 9 येते. 9 हा मंगळाचा अंक आहे. मंगळ आणि गुरु हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे 3 या अंकाचा 9 हा अंक मित्र अंक ठरतो. त्यामुळे 3 या शुभांकासाठी येणारे वर्ष देखील शुभकारक असणार आहे.
advertisement
नवीन वर्षात 3 मूलांक असणाऱ्यांना सामाजिक यश, कीर्ती, प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. तसेच धार्मिक यात्रा तसेच धर्मादाय गोष्टींशी संबंधित ज्या काही संस्था असतील त्या सर्व गुरुच्या अमलाखाली येतात. सार्वजनिक विश्वस्त संस्था, मंदिरे तसेच सामाजिक संस्था ट्रस्ट या सर्वांवरती गुरुचा अंमल राहतो. त्यामुळे येणारे 2025 हे वर्ष धार्मिक गोष्टींचा प्रभाव असणारे वर्ष असेल, असं देखील ज्योतिषशास्त्री सांगतात.
advertisement
धार्मिक गोष्टीत अनपेक्षित निकाल
यंदा धार्मिक वादविवादात गुरुच्या बाजून निकाल लागूने हे वाद संपू शकतात. उदा. काशी, मथुरा, अयोध्या अशा ठिकाणी धार्मिक वादविवाद सुरू आहेत. त्यांचा निवाडा होऊ शकतो. मंगळ हा धाडसाचा कारक असल्याने न्यायालयीन निकाल धर्माच्या बाजूने लागतील. तसेच ते दूरगामी परिणा करणारे ठरतील, असंही ज्योतिषी कदम सांगतात.
advertisement
धार्मिक यात्रा घडतील
3 हा अंक गुरुशी संबंधित म्हणजेच धार्मिक गोष्टींशी संबंधित आहे. त्यामळे ज्या व्यक्तींचा मुलांक किंवा शुभांक 3 आहे त्यांच्या दूरच्या धार्मिक यात्रा घडतील. चारधाम, अमरनाथ, वैष्णोदेवी सारख्या यात्रा करण्याचा मानस यंदा पूर्ण होईल. धर्मादाय संस्थेशी संबंधित खटले देखील निकाली निघतील. समाजसेवेचं कार्य करणाऱ्यांना यश व कीर्ती मिळेल. 9 अंकावरती गणपती व मारुतीचा प्रभाव असल्याकारणाने 3 अंकांनी देखील या दोन्हींची उपासना केल्यास त्यांच्या यशामध्ये आणखीन वृद्धी होईल. ज्या काही थोड्या अडचणी असतील त्या देखील दूर होऊन प्रतिष्ठा वाढेल, असं ज्योतिषी सांगतात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 03, 2024 3:52 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: 2025 मध्ये अनपेक्षित घटनांनाचे आव्हान; 3, 12, 21 आणि 30 जन्मतारीख तुमची तर नाही ना?