Shani Amavasya 2025: शनि अमावस्येला या 5 मंत्रांचा उच्चार शुभ फळदायी! साडेसाती-अडीचकी होते प्रभावहीन
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Amavasya 2025 Mantra: शनी अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. शनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्यानंतर तुम्ही काही मंत्रांचा जप करू शकता.
मुंबई : हिंदू धर्मात शनी अमावस्येला खूप विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथी शनिवारी येते, तेव्हा तिला शनी अमावस्या किंवा शनैश्चरी अमावस्या असं म्हणतात. हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शनी अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. शनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्यानंतर तुम्ही काही मंत्रांचा जप करू शकता. या मंत्रांचा जप केल्याने त्रास दूर होतील आणि तुम्हाला देवतांचे आशीर्वाद मिळतील. शनी अमावस्येला कोणते मंत्र जप करावेत ते जाणून घेऊया.
शनी अमावस्येला जप करण्याचे मंत्र -
1. ओम पितृभ्यः स्वधा नमः
शनी अमावस्या किंवा कोणत्याही अमावस्येला, स्नान केल्यानंतर पूर्वजांसाठी हा मंत्र जप करून पूजा करू शकता. पूर्वजांसाठी हा मंत्र जप केल्याने ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. घरात पितृदोष असेल तर तो दूर होऊ शकतो.
2. ओम नमः शिवाय
शनि अमावस्येच्या दिवशी तुम्ही शंकराची पूजा करू शकता, शिव पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय जप करावा. महाकाल भगवान शिव आपल्या भक्तांना मोक्ष प्रदान करतात. मंत्राचा जप करून तुम्ही महादेवाला पूर्वजांच्या मोक्षासाठी प्रार्थना करू शकता. कमावलेले पुण्य पूर्वजांना दान करू शकता, ज्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होईल. महादेवाच्या कृपेनं सर्व प्रकारची पापे आणि दुःखे नष्ट होतील.
advertisement
3. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट आले तर तुम्ही शनी अमावस्येला महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचा जप केल्यानं सर्व प्रकारचे अशुभ दूर होतात. नकारात्मक ऊर्जा दूर होते. शंकराच्या कृपेने व्यक्तीला चांगले आरोग्य मिळते, तो दीर्घायुषी राहतो आणि भीती देखील नष्ट होते.
advertisement
4. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्॥
शनि अमावस्येच्या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा जप देखील करू शकता. या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्म्याला शुद्धी मिळते. आनंद, शांती आणि विश्व कल्याणासाठी गायत्री मंत्राचा जप केला जातो.
5. ॐ क्रीं कालिकायै नम:
अमावास्याचा दिवस तंत्र आणि मंत्राच्या सिद्धीसाठी योग्य मानला जातो. या दिवशी तुम्ही देवी कालीचा हा मंत्र जप करू शकता. यामुळे पठण करण्याला शक्ती मिळते आणि शत्रूचा पाडाव होतो. व्यक्तीमध्ये धैर्य आणि शौर्य वाढते, असे मानले जाते.
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 3:55 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shani Amavasya 2025: शनि अमावस्येला या 5 मंत्रांचा उच्चार शुभ फळदायी! साडेसाती-अडीचकी होते प्रभावहीन