मेहनतीचे मिळेल पूर्ण फळ; पाहा कन्या राशीचे मार्च महिन्यातील भविष्य, Video

Last Updated:

करिअर, प्रेम आणि शिक्षण याबाबत कन्या राशीसाठी मार्च महिना कसा असेल? जाणून घ्या.

+
News18

News18

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : फेब्रुवारी संपून सुरु होणारा नवा महिना म्हणजेच मार्च महिना. मार्च हा वर्षातील तिसरा महिना आहे. त्यामुळे नवीन महिना सुरु झाला की अनेकजण मासिक राशीभविष्य पाहात असतात. कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा जाणार आहे? याबाबत पुणे येथील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिलीय.
कसा जाईल मार्च महिना?
कन्या राशीसाठी हा मार्च महिना निजी बाबतीत खूप अनुकूल राहण्याची शक्यता आहे तर करिअरच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमचे आरोग्य कमजोर राहू शकते. त्यामुळे तुम्हाला आपल्या योजना हा विचार करून लक्षात ठेवाव्या लागतील. जर तुम्ही आरोग्याची काळजी घेतली नाही तर समस्या वाढू शकतात. देशातून बाहेर जाण्यात यश मिळू शकते. जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करायची आहे तर यासाठी ही वेळ अनुकूल राहील, असं राजेश जोशी सांगतात.
advertisement
Feng Shui Tips: फेंगशुईच्या मदतीने घरात सुख-समृद्धी येते आणि होतात वास्तुदोष दूर
धार्मिक गोष्टींमध्ये बरेच मन लागेल. त्यात खर्च ही होईल. तुमची आर्थिक स्थिती ठीक-ठाक राहील. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवणे आवश्यक असेल कारण समस्या त्यांचे मन विचलित करू शकते. प्रेम संबंध घनिष्ठ होतील. करिअरच्या दृष्टीने पाहायचे झाले तर दशम भावाचा स्वामी बुध महाराज कुंडलीच्या सहाव्या भावात सूर्य आणि शनी सोबत स्थित राहील. तुम्हाला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र पंचम भावात विराजमान राहतील. यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्ये बाधा येतील, असं राजेश जोशी सांगतात.
advertisement
Mahashivratri Shubh Yoga: 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला जुळून आलाय असा योग; या 4 राशींचे उजळणार भाग्य
तुमचे मन इतर गोष्टींमध्ये अधिक लागेल आणि शिक्षणात लक्ष देणे तुम्हाला थोडे कठीण होऊ शकते. जर तुमच्या प्रेम संबंधाची गोष्ट केली असता महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र जसे ग्रह पंचम भावात विराजमान राहतील. येथे उपस्थित होऊन उच्च मंगळ तुम्हाला आपले प्रेम अधिक मजबूत करू शकते. महिन्याच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि शुक्र पंचम भावात बसून तुमच्या एकादश भावाला पाहतील. यामुळे तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ पहायला मिळेल. व्यवसायात ही उत्तम लाभ होईल आणि यामुळे तुम्ही लाभान्वित व्हाल, अशी माहितीही जोतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
मेहनतीचे मिळेल पूर्ण फळ; पाहा कन्या राशीचे मार्च महिन्यातील भविष्य, Video
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement