Yamaha ने सादर केला इलेक्ट्रिक स्कूटर्सचा बाप Aerox! सिंगल चार्जमध्ये धावेल 106km
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Aerox E Electric Scooter: एरोक्स ई डिझाइन आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत भविष्याची झलक दाखवते. त्याची स्पोर्टी आणि अॅथलेटिक डिझाइन Aerox 155 सारखीच आहे. फीचर्समध्ये ट्विन LED क्लास D हेडलाइट्स, LED फ्लॅशर्स आणि 3D-इफेक्ट LED टेललाइट समाविष्ट आहेत.
Aerox E Electric Scooter: यामाहा मोटर इंडिया, जी बऱ्याच काळापासून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची वाट पाहत होती. तिने अखेर भारतीय बाजारात त्यांचे पहिले इलेक्ट्रिक स्कूटर, एरोक्स ई आणि EC-06 सादर केले आहेत. एरोक्स ई ही एक उच्च-कार्यक्षमता असलेली ई-मॅक्सी स्कूटर आहे. जी लोकप्रिय Aerox 155 ची इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. लाँचिंगसह, यामाहाने भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये एक मोठे पाऊल टाकले आहे. ही स्कूटर त्याच्या रेसिंग-प्रेरित डिझाइन आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचे शानदार कॉम्बीनेशन देते.
Aerox E मध्ये यूनिक काय आहे? यामाहा एरोक्स ई ही एक मॅक्सी-स्पोर्ट्स इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी 9.4kW पॉवर आणि 48 Nm टॉर्क निर्माण करणारी एक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज आहे. यामध्ये 6 किलोवॅट क्षमतेचे ड्युअल डिटेचेबल 3 किलोवॅट क्षमतेचे बॅटरी पॅक वापरले आहेत. जे यूझर्स घरी सहजपणे काढू शकतात आणि चार्ज करू शकतात. या बॅटरी पोर्टेबल करण्यासाठी एर्गोनॉमिक ग्रिप्स देखील देण्यात आल्या आहेत. यामाहा एका चार्जवर 106 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंजचा दावा करते. रायडिंग अनुभव वाढवण्यासाठी, ते तीन रायडिंग मोड देते. इको, स्टँडर्ड आणि पॉवर. याव्यतिरिक्त, जलद एक्सीलरेशनसाठी बूस्ट फंक्शन आणि रिव्हर्स मोड देखील उपलब्ध आहेत.
advertisement
डिझाइन आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, Aerox E भविष्याची झलक देते. त्याची स्पोर्टी आणि अॅथलेटिक डिझाइन Aerox 155 सारखीच आहे. फीचर्समध्ये ट्विन एलईडी क्लास डी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स आणि 3D-इफेक्ट एलईडी टेललाइट समाविष्ट आहेत. रायडरला सर्व आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी, यात 5-इंचाचा टीएफटी कलर स्क्रीन आहे, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील देतो. ही स्क्रीन यामाहा वाय-कनेक्ट अॅप इंटिग्रेशनला सपोर्ट करते, जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वाहन आकडेवारी, पार्किंग लोकेशन आणि मेंटेनेंस रिमाइंडरसारख्या सुविधा प्रदान करते.
advertisement
सुरक्षितता आणि सोयीसाठी, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक प्रगत फीचर्स आहेत. ज्यात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनेल ABS, प्रगत मोटर कंट्रोल आणि राइड-बाय-वायर प्रिसिजन यांचा समावेश आहे. डिटेचेबल ड्युअल बॅटरी सेटअप आणि स्मार्ट की सिस्टम सारखी फीचर्स ICE (अंतर्गत ज्वलन इंजिन) स्कूटरच्या तुलनेत आरामदायी आणि सोयीस्कर राइडिंग अनुभव प्रदान करतात. Aerox E सोबत, यामाहाने भारतीय बाजारात EC-06 मॉडेल देखील सादर केले. जरी एरोक्स ई त्याच्या उच्च-कार्यक्षमता फीचर्समुळे अधिक लोकप्रिय आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये यामाहाच्या प्रवेशामुळे भारतात उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्ससाठी एक नवीन मार्ग उघडेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 12:38 PM IST


