बुलेटला टक्कर द्यायला येतेय, ब्रिटिश ब्रँडची स्वस्त बाइक, मार्केटमध्ये नुसता राडा!

Last Updated:

स्पीड 400 प्रमाणे या नवीन बाइकमध्ये कार्निव्हल रेड आणि फँटम ब्लॅक असे दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असू शकतात.

News18
News18
मुंबई: आतापर्यंत बजाज ऑटो आणि ट्रायम्फ मोटर्सची भागीदारी चांगलीच यशस्वी ठरली आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन पहिल्यांदा 400cc मोटरसायकल लाँच केली होती. आता ही जोडी आणखी एक नवीन आणि किफायतशीर बाइक लाँच करण्याची योजना आखत आहे. यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या लाइनअपचा विस्तार होणार आहे. या दोन्ही कंपन्या 17 सप्टेंबर 2024 रोजी स्पीड 400 वर आधारित एक नवीन 400cc बाइक भारतीय बाजारात सादर करणार आहेत.
बजाज-ट्रायम्फ 400 फ्लॅटफॉर्मवर आधारित दोन नवीन मोटरसायकल लाँच करण्याची तयारी करत आहे. बजाज ऑटो या बाइकचं उत्पादन भारतात करणार आहे. ट्रायम्फने काही दिवसांपूर्वी या आगामी बाइकबाबत पहिल्यांदा घोषणा केली होती. ही एक प्रगत मोटरसायकल असेल. या नवीन बाइकचा फ्युएल टँक स्पीड 400 प्रमाणे दिसतो. त्यामुळे ही बाइक स्पीड 400 च्या धर्तीवर डिझाइन केलेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.
advertisement
स्पीड 400 प्रमाणे या नवीन बाइकमध्ये कार्निव्हल रेड आणि फँटम ब्लॅक असे दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असू शकतात. या रंगांमुळे तिचा लूक आकर्षक असेल. नवीन बाइकचा फ्युएल टँक पाहिल्यावर ती थ्रक्सटन 400 प्रमाणे नसेल, असं वाटतं. परदेशातल्या बाजारांत टेस्टिंगदरम्यान ही बाइक पाहायला मिळाली आहे. ही नवीन बाइक 17 सप्टेंबर 2024 रोजी भारतात लाँच होईल. अद्याप या बाइकविषयी सविस्तर माहिती मिळालेली नाही. पण ही थ्रक्सटन 400 असण्याची शक्यता खूप कमी आहे. टीझरच्या माध्यमातून या बाइकची सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. त्यामुळे ही बाइक अद्याप एक रहस्य बनून राहिली आहे.
advertisement
300cc ते 500cc सिंगल सिलिंडर मोटरसायकल सेगमेंटमध्ये रॉयल एन्फिल्डचा दबदबा आहे. ट्रायम्फ या सेगमेंटमध्ये एक किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देऊ शकते. ही नवीन बाइक रॉयल एन्फिल्डशी स्पर्धा करण्यासाठी बजाज -ट्रायम्फ स्पीड 400 चा सर्वांत किफायती व्हॅरिएंट असू शकते. या बाइकची किंमत दहा हजार रुपयांपर्यंत घटवली जाऊ शकते. रॉयल एन्फिल्ड गुरिल्ला 450 लाँचिंग बघता ही शक्यता वाढली आहे.
advertisement
टीझरमध्ये बाइकचे बार-एंड मिरर पाहायला मिळतात. स्पीड 400 शी तुलना करता या नवीन बाइकमध्ये काही फीचर्स काढून टाकले जाऊ शकतात. ही बाइक म्हणजे स्पीड 400 चा स्पोर्टियर अॅक्सेसराइड व्हॅरिएंट असू शकतो.
नवीन ट्रायम्फ 400cc बाइक स्पीड 400 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. या दोन्ही बाइकमधली बहुतांश फीचर्स आणि डिव्हाइस सारखीच असतील. यात 398cc सिंगल सिलिंडर डीओएचसी 4V लिक्विड कूल्ड इंजिन असेल. हे इंजिन 39.5bhp पॉवर आणि 37.5Nm टॉर्क जनरेट करील. यात 6-स्पीड गियरबॉक्स असेल. यामुळे ही बाइक दमदार परफॉर्मन्स देऊ शकेल.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
बुलेटला टक्कर द्यायला येतेय, ब्रिटिश ब्रँडची स्वस्त बाइक, मार्केटमध्ये नुसता राडा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement