advertisement

Electric vs Hybrid Cars, सध्याच्या काळात कोणती गाडी खरेदी करणं बेस्ट? घ्या जाणून

Last Updated:

Electric vs Hybrid Cars: तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल मात्र Electric आणि Hybrid मध्ये कंफ्यूज आहात का? वाढत्या पेट्रोलच्या किंमती आणि ईव्ही टेक्नॉलॉजीच्या काळात योग्य पर्याय निवडणे सोपं नाही.

इलेक्ट्रिक vs हायब्रिड कार
इलेक्ट्रिक vs हायब्रिड कार
Electric vs Hybrid Cars:  आजच्या काळात पर्यावरण संरक्षण आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे लोक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारकडे वळत आहेत. भारतात 2026 पर्यंत ईव्ही बाजार वेगाने वाढत आहे. मात्र चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरची कमतरता आणि बॅटरीचा खर्च हे अजुनही आव्हान आहे.
तसंच, हायब्रिड कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पावरचं लांब अंतरासाठी सोयीस्कर कनेक्शन प्रदान करते. तुम्हीही येत्या दिवसात एक चांगली कार खरेदी करु इच्छित असाल आणि दोन्हीमधून कोणती घ्यावी यासाठी कंफ्यूज असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण दोन्हीची तुलना करु आणि सांगू की, सध्याच्या काळात कोणता पर्याय बेस्ट आहे.
advertisement
Electric Cars चे फायदे आणि नुकसान 
इलेक्ट्रिक कार पूर्णपणे बॅटरीवर चालतात. ज्या झिरो एमिशन प्रदान करतात. 2026 मध्ये भारतात EVs ची रनिंग कॉस्ट खुप कमी आहे. वीजेची किंमत जवळपास 8 रुपये प्रति यूनिट असल्याने प्रति किलोमीटरचा खर्च 1-2 रुपयांपर्यंत येतो. मेंटेनेंसही कमी आहे. कारण कोणतंही इंजिन ऑइल किंवा क्लच नसतं.
advertisement
सरकारी अनुदान आणि 5% जीएसटी यामुळे ईव्ही परवडणाऱ्या बनत आहेत. उदाहरणार्थ, टाटा नेक्सॉन ईव्ही किंवा एमजी झेडएस ईव्ही सारखे मॉडेल शहरात 300-400 किमीचा प्रवास देतात. तसंच 8-10 वर्षांनी बॅटरी बदलणे महाग असू शकते (लाखो रुपयांमध्ये). चार्जिंग पायाभूत सुविधा सध्या शहरांपुरती मर्यादित आहेत आणि ग्रामीण भागात ही समस्या आहे. पूर किंवा मुसळधार पावसात ईव्ही धोकादायक असू शकतात. रीसेल व्हॅल्यू देखील हायब्रिडपेक्षा कमी असते.
advertisement
Hybrid Cars चे फायदे आणि नुकसान
हायब्रिड कार पेट्रोल इंजि नआणि इलेक्ट्रिक मोटरचं मिश्रण आहेत. ज्या फ्यूल एफिशिएन्सी वाढवतात. 2026 मध्ये टोयोटा इनोवा हायक्रॉस किंवा मारुती ग्रँड विटारासारखे मॉडल 28 किमी/लीटर मायलेज देतात. ज्या पेट्रोल कारपेक्षा बेस्ट आहेत.
पेट्रोल पंप सर्वत्र उपलब्ध असल्याने आणि रेंजची चिंता नसल्यामुळे ते लांबच्या प्रवासासाठी परिपूर्ण आहेत. बॅटरी लहान आहे, त्यामुळे बदलणे स्वस्त आहे. रीसेल व्हॅल्यू EVsपेक्षा चांगले आहे, परंतु ते अधिक महाग आणि इंधनावर अवलंबून आहेत. यामुळे ईव्हीपेक्षा जास्त एमिशन होते. प्लग-इन हायब्रिड ईव्हीपेक्षा जास्त महाग असू शकतात.
advertisement
कोणती आहे बेस्ट?
भारतात EVs स्वस्त ठरतात. विशेषतः तुम्ही शहरात ड्राइव्ह करता आणि घरी/ऑफिसमध्ये चार्जिंगची सुविधा आहे. पाच वर्षात इंधन आणि मेंटेनेन्सवर बचत EVs ला फायदेशीर बनवतात. तुमच्या ट्रिप अनियमित, लांब किंवा खराब चार्जिंग नेटवर्क असलेल्या भागात असतील तर हायब्रिड वाहनांना प्राधान्य दिले पाहिजे. ईव्ही तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, परंतु सध्या हायब्रिड वाहने अधिक विश्वासार्ह आहेत. पर्यावरणीय दृष्टिकोनातून ईव्ही चांगले आहेत, परंतु हायब्रिड वाहने हा एक ट्रांझिशनल पर्याय आहे.
advertisement
फायनल वर्डिक्ट : यामधून एकाला विनर मानले जाऊ शकत नाही. कोणता ऑप्शन चांगला आहे हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. तुम्हाला एमशीन हवं नसेल तर Electric Cars निवडा. EV आणि ICE चं संतुलन हवं असणाऱ्यांसाठी Hybrid Cars खुप बेस्ट ऑप्शन आहे. तुमच्या गरजा आणि बजेटच्या हिशोबाने तुम्ही यामधून एक निवडू शकता.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Electric vs Hybrid Cars, सध्याच्या काळात कोणती गाडी खरेदी करणं बेस्ट? घ्या जाणून
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement