Hyundai चा ऑफर धमाका, Creta आणि Exter आणा घरी, 70000 रुपये डिस्काउंट, आणि...
- Published by:Sachin S
Last Updated:
पुढील महिना हा मार्च असल्यामुळे आर्थिक वर्षाचा अखेर आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी खास ऑफर्स घेऊन आल्या आहेत.
भारतात सध्या कार घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. कारण, जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहे. अशात पुढील महिना हा मार्च असल्यामुळे आर्थिक वर्षाचा अखेर आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी खास ऑफर्स घेऊन आल्या आहेत. दक्षिण कोरियन कंपनी Hyundai मोटर्सने आपल्या Grand i10 Nios, i20, Aura, Exter, Venue, Verna, Creta आणि Alcazar सारख्या मॉडेलवर खास ऑफर्स आणल्या आहेत.
Hyundai मोटर्सने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक असलेल्या Grand i10 Nios कारवर खास ऑफर आणली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत या कारवर ४८,००० पर्यंत बचत होऊ शकते. Grand i10 Nios ची किंमत ७ लाखांपासून सुरू होते, या कारवर ४८ हजारांची डिस्काऊंट ऑफर दिली आहे. तर i20 आणि स्पोर्टी व्हर्जन N-Line व्हेरियंटवर देखील ४८,००० पर्यंतची सूट दिली आहे. या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट सोबतच एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज इन्सेंटिव्हचा देखील समावेश आहे.
advertisement
Exter आणि Venue वरही खास ऑफर
Hyundai ची बजेटबेस असलेली Exter मिडसाईज एसयूव्हीच्या मिड आणि टॉप व्हेरिएंट्स S आणि SX family वर ३३,००० रुपयांची बचत होईल. तर Hyundai ची लोकप्रिय असलेल्या Venue SUV वर फक्त ५००० रुपयांची सूट दिली आहे. ही एसयूव्ही अलीकडेच लाँच झाली आहे. त्यामुळे कंपनीने Venue SUV वर ऑफर देण्यासाठी टाळलं आहे.
advertisement
Verna आणि Creta वर काय ऑफर्स?
Hyundai ची Verna ही एक सेडान कार आहे. या कारवर सर्वाधिक ७३,००० पर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये IVT व्हेरिएंट्सवर कॅश डिस्काउंट आहे. Hyundai ची ऑलटाइम फेव्हरेट असलेली मिड-साईज एसयूव्ही Creta मात्र खास अशी काही ऑफर तर दिली नाही पण एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये २०,००० पर्यंतची बचत होणार आहे.
advertisement
Creta Electric वर खास सूट
Hyundai ने आपल्या Creta एसयूव्ही खास ऑफर दिली नाही पण याच एसयूव्हीच्याा Creta Electric व्हेरियंटवर सर्वात चांगली ऑफर दिली आहे. कॅश सूट, एक्सचेंज आणि स्क्रॅप पॉलिससह कंपनी 'अपग्रेड बोनस' दिला आहे. त्यामुळे Creta Electric घेणार असाल तर ७५,००० पर्यंत सूट मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात Hyundai कडून ही सर्वात मोठी ऑफर आहे. या सर्व ऑफर्स २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आणि स्टॉक संपेपर्यंत असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 9:21 PM IST







