Maruti आता मार्केट करणार जाम, Swift देईल आता 32 किमी मायलेज, कारण आहे खास
- Published by:sachin Salve
Last Updated:
मारुती सुझुकीची स्विफ्ट ही भारतातल्या लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. या लोकप्रिय स्विफ्ट हॅचबॅकचा सीएनजी व्हॅरिएंट भारतात लाँच झाला आहे.
मुंबई: वाहन उत्पादक कंपन्या कंपनी पेट्रोल आणि डिझेलसोबतच सीएनजी गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती करत आहेत. कारण सीएनजी कार पेट्रोल व डिझेल कारपेक्षा चालवायला स्वस्त पडतात. मारुती सुझुकीची स्विफ्ट ही भारतातल्या लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. या लोकप्रिय स्विफ्ट हॅचबॅकचा सीएनजी व्हॅरिएंट भारतात लाँच झाला आहे. मारुती स्विफ्ट सीएनजी 12 सप्टेंबर 2024 रोजी अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आली आहे. कारचं न्यू जनरेशन मॉडेल 9 मे 2024 रोजी नवीन पेट्रोल इंजिनसह लाँच झालं होतं. आता चार महिन्यांनी सीएनजी व्हॅरिएंट आला आहे.
सीएनजी कार खिशाला परवडतात. सीएनजीचा खर्च पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी असतो. सीएनजी व्हॅरिएंटमध्ये मायलेज चांगलं मिळतं. सीएनजी गाड्यांमुळे प्रदूषण कमी होतं. त्यामुळेो पर्यावरणासाठीही सीएनजी गाड्या चांगल्या आहेत. या हॅचबॅक कारमध्ये ग्राहकांना 1.2-लिटर तीन सिलिंडर झेड12ई नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे आता असलेल्या 1.2 लिटर के सीरिज चार सिलिंडर इंजिनच्या तुलनेत खूप चांगलं मायलेज देतं.
advertisement
किंमत किती?
स्विफ्ट सीएनजीचे भारतीय बाजारात VXI, VXI (O) आणि ZXI हे व्हॅरिएंट्स लाँच करण्यात आले आहेत. या कारचा बेस व्हॅरिएंट VXI हा आहे. या व्हॅरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8,19,500 रुपये आहे आणि टॉप व्हॅरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9,19,500 रुपये आहे.
इंजिन आणि पॉवर
मारुतीने स्विफ्ट सीएनजीमध्ये नवीन झेड सीरिज इंजिन दिलं आहे. पेट्रोल इंजिनशी तुलना करायची झाली तर दोन्हीत काही बदल पाहायला मिळतात. 1.2 लिटरचं इंजिन सीएनजी मोडमध्ये 69.75 पीएस पॉवर आणि 101.8 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं.
advertisement
स्विफ्ट सीएनजीची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
मारुती स्विफ्ट ही भारतातल्या सर्वांत लोकप्रिय कारपैकी एक आहे. आता या कारच्या सीएनजी व्हॅरिएंटमध्ये ग्राहकांना पेट्रोल व्हॅरिएंटप्रमाणेच फीचर्स दिली जात आहेत. यात एबीएस, ईएसपी प्लस, स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसंच ग्राहकांना कारमध्ये सात इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि सुझुकी कनेक्टसारखी फीचर्स मिळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2024 11:46 PM IST