Ratan Tata : इंडिकामुळे थट्टा झाली, 10 वर्षात फोर्डला शिकवला धडा, तर स्कूटरपासून प्रेरणा घेत सामान्यांसाठी आणली नॅनो
- Published by:Suraj
Last Updated:
टाटा मोटर्सच्या इंडिका कारमुळे झालेली थट्टा आणि त्यानंतर थट्टा करणाऱ्या कंपनीला शिकवलेल्या धड्याचा किस्सा आता चर्चेत आला आहे.
मुंबई : रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग विश्वावर शोककळा पसरलीय. रतन टाटा यांनी केलेल्या कामाचे किस्से आता शेअर केले जात आहेत. यात टाटा मोटर्सच्या इंडिका कारमुळे झालेली थट्टा आणि त्यानंतर थट्टा करणाऱ्या कंपनीला शिकवलेल्या धड्याचीही चर्चा होत आहे. ९०च्या दशतका टाटा मोटर्सने इंडिका कार लाँच केली पण तिला प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी कंपनीचा प्रवासी कारचा विभाग फोर्ड कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला होता.
फोर्ड कंपनीकडून यावेळी टाटांची थट्टा करताना म्हटलं गेलं होतं की, "प्रवासी कारची माहिती नव्हती तर प्रवासी गाड्यांचा विभाग का सुरू केलात? तुमचा हा बिझनेस आम्ही खरेदी करणं हे तुमच्यावर उपकारच होतील." टाटांना हे बोलणं मनाला लागलं. पण यावर काहीच न बोलता रतन टाटा परतले.
फोर्डच्या बैठकीनंतर रतन टाटा यांनी पॅसेंजर कार विभाग न विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडवली. फोर्डकडून झालेल्या अपमानानंतर दशकभरात टाटा मोटर्सने मोठी झेप घेतली.
advertisement
दरम्यान, फोर्ड कंपनीवर दिवाळखोरीची वेळ आली. तर टाटा मोटर्स प्रगतीच्या शिखरावर होते. यावेळी फोड्र कंपनीचा एक ब्रँड खरेदी करण्याचा प्रस्ताव टाटा समुहाने दिला. यावेळी रतन टाटा आणि फोर्ड यांच्यात बैठक झाली. टाटांनी जग्वार आणि लँड रोव्हर खरेदी केली. तेव्हा फोर्ड यांनी टाटांना म्हटलं की, जग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करून तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात.
advertisement
स्कूटरवरून नॅनोची प्रेरणा
सर्वसामान्यांना परडवणारी अशी सर्वात स्वस्त कार नॅनो ही टाटा मोटर्सने बाजारात आणली. रतन टाटा यांना नॅनो कारचे शिल्पकार म्हटलं जातं. दुचाकी वापरणाऱ्या भारतीय कुटुंबाला परडवणारी कार बनवण्यासाठी त्यांनी नॅनोची निर्मिती केल्याचं सांगितलं होतं. रतन टाटांनी एका इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं की, भारतातील कुटुंबं स्कुटरवरून जाताना नेहमी बघत आलो. आई-बाबा आणि त्यांची मुलं अशी गाडीवरून फिरायची. ते पाहूनच मला कुटुंबासाठी आणि परडवणारी अशी कार निर्माण करण्याची इच्छा झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2024 12:53 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Ratan Tata : इंडिकामुळे थट्टा झाली, 10 वर्षात फोर्डला शिकवला धडा, तर स्कूटरपासून प्रेरणा घेत सामान्यांसाठी आणली नॅनो