advertisement

Delhi Red Fort Blast Update: दिल्लीत लालकिल्ल्याजवळ 'या' कारमध्ये झाला स्फोट, VIDEO आला समोर

Last Updated:

या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती एक सीएनजी कार होती

News18
News18
दिल्ली: मागील अनेक वर्षांपासून शांत असलेली दिल्ली शहर स्फोटानं हादरलं. लाल किल्ल्यासमोर एका कारमध्ये भीषण असा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती एक सीएनजी कार होती. प्राथमिक माहितीनुसार,  सीएनजी कारचा हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे घटनास्थळी अद्याप कोणतेही स्फोटकं आढळली नाही, पोलीस आणि तपास यंत्रणा सगळ्या बाजूने तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहेय हा स्फोट एका हुंदईच्या I20 कारमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या परिसरात ही कार उभी होती. संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास स्फोट झाला.
advertisement
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूचा परिसर स्फोटानं हादरला. घटनास्थळी I20 कारजवळ उभ्या असलेली कार, रिक्षा आणि दुचाकींना आग लागली. या स्फोटामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटानंतर गाड्यांना आग लागली. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू केलं आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत असून, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सुरक्षा यंत्रणांनी परिसर सील केला आहे आणि सर्व बाजूने तपास सुरू आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच )
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Delhi Red Fort Blast Update: दिल्लीत लालकिल्ल्याजवळ 'या' कारमध्ये झाला स्फोट, VIDEO आला समोर
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement