Special blog: 'मशाल'ची मागणी अन् पवार-पटोलेंचं दुर्लक्ष, मविआत उद्धव ठाकरे का झाले नकोसे?
- Published by:sachin Salve
Last Updated:
आता ठाकरे महाविकास आघाडीत आहे. ठाकरेंना डावलण्याचे दररोज नवे प्रकार समोर येत आहेत.
राहुल झोरी, प्रतिनिधी
शब्द द्यायचा आणि तो शेवटपर्यंत न्यायचा ही शिवसेनेची कार्यपद्धती राहिलेली आहे. शिवसैनिक महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री होईल. हा शब्द उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिला होता. त्यांनी स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत 2019 ला शब्द पूर्ण केला होता. मात्र, महाविकास आघाडीत ठाकरेंना दिलेला शब्द पुर्ण होत नाही. 2019 विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजप आणि शिवसेनेत मोठी धुसफूस होती. राजकीय भाषणाच्या मंचावर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त करण्यात आल्या. टीका टिप्पणी झाली. परिणामी 2019 ला युती तुटली. आता ठाकरे महाविकास आघाडीत आहे. ठाकरेंना डावलण्याचे दररोज नवे प्रकार समोर येत आहेत.
advertisement
महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेत हे चित्र पुन्हा दिसून आलं. मुंबईत ही सभा आयोजित करण्यात आली होती. ठाकरेंनी यजमानपद स्वीकारत सुरुवातीला भाषण केलं. या भाषणात त्यांनी मित्र पक्षांना आवाहन केलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मग निवडणूकांना सामोरं जावं. असा हेका त्यांचा होता. मात्र, पवार आणि पटोलेंनी ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं. ठाकरेंच्या मागणीला प्रतिसाद ही दिला नाही. आपली री ओढली. दिल्ली दौरा असो की मुंबईचा मेळावा. ठाकरेंना महाविकास आघाडीत दुय्यम स्थान दिलं जातंय का? ठाकरेंनी मिळवलेल्या सहानभूतीचा मविआने फायदा घेतला. आता परतफेडीची वेळ आल्यावर ठाकरेंकडे पाठ फिरवली जातीये का? असा प्रश्न निर्माण होतोय.
advertisement
काय म्हणाले ठाकरे?
मुंबईच्या ष्णमुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या ठाकरे बोलायला आधी उभे राहिले. ओपनिंग बॅट्सम असा स्वतःचा उल्लेख करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. महाविकास आघाडीतील पवारांच्या राष्ट्रवादीने किंवा कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहिर करावा, मी समर्थन द्यायला तयार आहे. या शब्दात ठाकरेंनी आक्रमकतेने म्हणणं मांडलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा? आज हे कॉंग्रेसने जाहीर करावं, पवार साहेबांनी जाहीर करावं. मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे.” हे बोलल्यानंतर ठाकरे पुढे म्हणाले, “फक्त जागेमध्ये मारामारी करु नका. आम्ही २५ वर्षे सेना भाजप युतीत होतो. ज्याच्या जागा येतील. त्याचा मुख्यमंत्री असं घोषित करायचो. मग पाडापाडीचं राजकारण व्हायचं. पाडापाडीच्या राजकारणात युतीला काय महत्त्व राहिलं?” असा सवाल त्यांनी केला.
advertisement
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधी ठरवा मग पुढे जा. असं मत ठाकरेंनी मांडलं. पवारांना उद्देशून ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असायला हवा, हे त्यांनी (पवारांनी) सांगावे. आम्ही त्या प्रस्तावाचे समर्थन करु.” ठाकरेंच्या या मागणीला पवारांनी टोलवून लावलं. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर काहीच भाष्य केलं नाही. पवार म्हणाले, “आपल्याला एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढायची आहे. सर्व पक्षांना एकत्रितपणे महाविकास आघाडीतील उमेदवारांना विजयी करायचं आहे.” हे विधान करत पवारांनी नाना पटोलेंची पाठराखण केली. मविआच्या मेळाव्यात ठाकरे एकटे पडल्याचं दिसून आलं.
advertisement
लढाईला ठाकरे, फायद्याला आघाडी?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं. ठाकरेंनी केलेला आक्रमक प्रचार अनेक ठिकाणी कामाचा ठरला. उदाहणार्थ अमरावतीची जागा घ्या. माजी खासदार नवनीत राणांनी मातोश्री बाहेर शक्ती प्रदर्शन केलं होतं. तिथली ठाकरेंची जागा कॉंग्रेसने घेतली. ठाकरेंनी ताकद लावली. कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. ठाकरेंच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठणाचा स्टंट ठाकरेंनी राणांवर उलथून लावला. असे अनेक मतदारसंघ आहेत जिथं ठाकरेंनी चावी फिरवली होती. आता मात्र परिस्थिती बदललीये. विधानसभा निवडणुकीत पारंपारिक मित्र असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरेंकडं दुर्लक्ष करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातंय.
advertisement
शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंनी अनेक यात्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचं काम केलं. महविकास आघाडीसाठीचं सहानभूतीच्या राजकारणाचं मैदान तयार केलं. यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी फुटली. मात्र, ठाकरेंप्रमाणे आक्रमक प्रचार झाला नाही. अंग चोरुन अजितदादांवर टीका करणारे पवार गटाचे आमदार चर्चेत होते. महाविकास आघाडीच्या यशात ठाकरेंचं योगदान मोठं आहे. याचा विधानसभेला परतावा ठाकरेंना अपेक्षित होता. मात्र, ऐनवेळी पवार आणि पटोलेंनी हात वर केलेत. ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी धुडकावून लावली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2024 7:43 PM IST
मराठी बातम्या/Blog/
Special blog: 'मशाल'ची मागणी अन् पवार-पटोलेंचं दुर्लक्ष, मविआत उद्धव ठाकरे का झाले नकोसे?