परीक्षेचं टेन्शन सोडा, थेट मुलाखतीतून होणार भरती, लगेच करा अर्ज
- Published by:News18 Marathi
Last Updated:
केवळ मुलाखतीतून नोकरी मिळणार असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
मुंबई: नोकरीच्या शोधात असणारांसाठी मोठी संधी आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय पुण्यात थेट भरती होत आहे. केवळ मुलाखतीतून नोकरी मिळणार असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. नुकतेच या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीय.
महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. यामध्ये विजिटिंग फॅकल्टी पदांचा समावेश आहे. थेट मुलाखतीतून भरती प्रक्रिया आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 3 जानेवारी 2024 ला मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे. वेळ खूप कमी असल्याने लवकरात लवकर तयारी करावी लागणार आहे.
advertisement
कुठं आहे भरती प्रक्रिया?
या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था, शिवाजी नगर, पुणे येथे होत आहे. त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी सकाळी 10.30 ला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशीरा आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाणार नाही. त्यामुळे मुलाखतीला येण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित पाहावी लागणार आहे.
advertisement
दरम्यान, महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था यांच्या वेब साईटवर याबाबत सविस्तर माहिती मिळेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती पाहावी.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 01, 2024 6:24 PM IST