Success Story : वयाच्या 15व्या वर्षी 300 रुपये घेऊन घरातून बाहेर पडली, आज आहे 100 कोटींची मालकीण

Last Updated:

. केवळ 15 व्या वर्षी त्यांनी स्वतःचं घर सोडलं. त्यानंतरच्या काळात केवळ रोजचे 20 रुपये कमवून त्यांनी दिवस काढले, संघर्ष आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणलं आहे.

News18
News18
दिल्ली : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक टक्के टोणपे खावे लागतात. आयुष्यात आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांमधून शिकूनच यशाची वाट धुंडाळावी लागते. आज एक यशस्वी बिझनेसवूमन म्हणून नाव कमावलेल्या चीनू यांनी यांचाही प्रवास असाच आहे. केवळ 15 व्या वर्षी त्यांनी स्वतःचं घर सोडलं. त्यानंतरच्या काळात केवळ रोजचे 20 रुपये कमवून त्यांनी दिवस काढले, मात्र आज त्यांच्याकडे बीएमडब्ल्यूसारखी लक्झरी कार आहे. मेहनत, संघर्ष आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणलं आहे. ‘रूबन्स अ‍ॅक्सेसरीज’ हा दागिन्यांमधील एक प्रस्थापित ब्रँड आहे. या ब्रँडच्या संस्थापक चीनू काला यांची कहाणी अतिशय रंजक आहे. केवळ 300 रुपये घेऊन घरातून बाहेर पडलेल्या चीनू यांच्या या व्यवसायानं आज 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
विकीटिया वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर 1981 रोजी राजस्थानमध्ये चीनू यांचा जन्म झाला. सध्या त्या 43 वर्षांच्या आहेत. त्यांचं आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेलं आहे. त्यांनी स्वतःचं घर सोडलं तेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं. त्यांनी सेल्सगर्ल म्हणून कामाला सुरुवात केली. त्याचे त्यांना दररोज 20 रुपये मिळत होते. एखाद्या महत्त्वाकांक्षी व्यक्तीला जीवनातली छोटी छोटी आव्हानं रोखू शकत नाहीत. चीनू यांच्यासाठीही तो काळ खडतर होता, पण त्यांनी हार मानली नाही.
advertisement
व्यवसायाची सुरुवात
चीनू यांनी त्या काळात वेट्रेस, रिसेप्शनिस्ट आणि घरोघरी जाऊन कटलरी, कोस्टर सेट विकण्याचं कामही केलं. त्यानंतर त्या एका कापडाच्या दुकानात काम करू लागल्या. ग्राहकांशी कसं बोलायचं, उत्तम सेवा कशी द्यायची हे त्यांना तिथे शिकायला मिळालं.
वस्तू विकायच्या कशा याचे प्रत्यक्ष धडे त्यांनी आधीच घेतले होते. त्यामुळे त्यांनी रूबन्स अ‍ॅक्सेसरीज नावाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. सुरुवातीला त्यांनी त्यात तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. हळूहळू हा ब्रँड विकसित झाला व आज त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. एका छोट्याशा दुकानापासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय 2018 पर्य़ंत पाच दुकांनांवर जाऊन पोहोचला.
advertisement
कोरोना महामारीमध्ये मिळाली संधी
कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय तोट्यात गेले, पण चीनू यांच्यासाठी मात्र कोरोनानं संधी निर्माण केली. त्या काळात त्यांच्या ज्वेलरीच्या ऑनलाइन विक्रीमध्ये खूप वाढ झाली. ती संधी चीनू यांनी ओळखली व व्यवसाय विस्तारला. आता चीनू यांच्याकडे बीएमडब्ल्यू 5 सीरिज कार आहे. स्वतःच्या व्यवसायामध्ये मेहनत आणि निष्ठा या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं आहे.
advertisement
शार्क टँक ठरला टर्निंग पॉइंट
त्यांच्या व्यवसायात आणखी एक संधी त्यांना शार्क टँकमुळे मिळाली. शार्क टँकमध्ये सहभागी होऊन त्यांनी 1.5 कोटी रुपयांचा निधी मिळवला. इतक्या मोठ्या गुंतवणुकीमुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यु वाढली. त्यांची ओळखही मजबूत झाली. आर्थिक वर्ष 2022 मध्ये त्यांच्या कंपनीनं 51 कोटी रुपयांची विक्री केली आणि त्यांच्या ब्रँडकडे ग्राहक पुन्हा येण्याचा दर 30 टक्के होता. बेंगळुरूमधील त्यांच्या कंपनीला 1 टक्के शेअर्ससाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आणि 12 टक्के व्याजावर 50 लाखांची अतिरिक्त रक्कम देण्यात आली.
advertisement
एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या कार्य़कारी संचालक नमिता थापर, शुगर कॉस्मेटिक्सच्या सहसंस्थापक विनीता सिंह आणि बोट लाइफस्टाइलचे सहसंस्थापक अमन गुप्ता यांनी रूबन्समध्ये गुंतवणूक केली. “अमन, नमिता आणि विनीता यांनी जी गुंतवणूक केली आहे, तसंच जे मार्गदर्शन दिलं आहे, त्यामुळे रूबन्सला जागतिक पातळीवर नेण्यास मदत मिळेल. आमची ध्येय मोठी आहेत आणि येत्या काही वर्षांत आम्ही 1000 कोटी रुपयांची विक्री करू शकू याचा आम्हाला विश्वास आहे,” असं चीनू त्यावेळी म्हणाल्या होत्या.
advertisement
रूबन्स हा ब्रँड 2007 मध्ये लाँच करण्यात आला होता. बेंगळुरू, कोचीन आणि हैदराबाद इथं त्यांची 6 किरकोळ विक्रीसाठीची दुकानं उघडण्यात आली होती. सध्या मात्र कंपनी पूर्णपणे इ-कॉमर्सद्वारे विक्री करते. मिंत्रा, फ्लिपकार्ट तसंच www.rubans.in या स्वतःच्या वेबसाइटद्वारे त्यांची विक्री होते.
रूबन्सच्या संस्थापिका चीनू यांनी 2004मध्ये अमित यांच्याशी लग्न केलं. अमित यांनी एमबीए केलं असून चीनू यांच्या व्यवसायात ते मदत करतात. अमित यांच्या साथीनं चीनू यांना व्यवसायात धोका पत्करण्याचं बळ मिळालं व त्या यशस्वी होत गेल्या. लग्नानंतर त्या बेंगळुरू इथं स्थायिक झाल्या होत्या. रूबन्स अ‍ॅक्सेसरीज हा त्यांचा ब्रँड आज लोकप्रिय आहे. सामान्यांना परवडतील अशा दागिन्यांपासून ते महागड्या दागिन्यांपर्यंत सर्वकाही त्यांच्याकडे मिळतं.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : वयाच्या 15व्या वर्षी 300 रुपये घेऊन घरातून बाहेर पडली, आज आहे 100 कोटींची मालकीण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement