बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून मिळणार प्रवेशपत्र, एका क्लिकवर करा डाऊनलोड
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच 10 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुंबई : विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे बारावी. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी - मार्चमध्ये होणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच 10 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार
ही प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. त्यासाठी www.mahahsscboard.in ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
advertisement
विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेसाठी विभागीय मंडळाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांना ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. प्रवेशपत्र प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवेश पत्राची प्रिंट काढल्यानंतर त्यावर प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांचा सही शिक्का घ्यावा. त्यानंतरच प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशा काही सूचना राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिल्या आहेत.
advertisement
ऑनलाईन दुरुस्ती करता येणार
प्रवेशपत्रामध्ये काही दुरुस्त्या असल्यास उदा. नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दुरुस्त करण्यात याव्यात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी संबंधित लिंकद्वारे दुरूस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावे. त्यानंतर विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारीत प्रवेशपत्र पुन्हा उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांच्या फोटो मध्ये काही प्रोब्लेम असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो लावून सबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यायचे आहेत.
advertisement
प्रवेशपत्र हरवल्यास
view commentsप्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून हरवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे लिहून ते प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी सूचना कुलाळ यांनी दिली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 10, 2025 9:48 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून मिळणार प्रवेशपत्र, एका क्लिकवर करा डाऊनलोड


