CSC Aadhar Recruitment 2025: तरूणांना आधारमध्ये नोकरीची संधी! महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये भरती, अर्ज कसा आणि कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career News : आधारमध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आधार सेवा केंद्राने आधार ऑपरेटर आणि पर्यवेक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे फॉर्म भरले जात आहेत. ही भरती महाराष्ट्र उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेशसह 23 राज्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई: आधारमध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आधार सेवा केंद्राने आधार ऑपरेटर आणि पर्यवेक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे फॉर्म भरले जात आहेत. ही भरती महाराष्ट्र उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेशसह 23 राज्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड आणि गोव्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. परंतु उर्वरित राज्यांमध्ये अजूनही अर्ज सुरू आहेत. या सर्व राज्यांमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
रिक्त जागा किती?
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत काम करते. सध्या गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवार या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन जाहिरातीत जिल्हावार रिक्त पदांचाही उल्लेख आहे. ज्यानुसार उमेदवार त्यात अर्ज करू शकतात.
advertisement
पात्रता काय?
आधार पर्यवेक्षक आणि ऑपरेटरसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 12वी/10वी, 2 वर्षांचा आयटीआय/ 10वी आणि 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा इत्यादी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे UIDAI द्वारे प्रमाणित एजन्सीकडून आधार सेवेमध्ये आधार ऑपरेटर/पर्यवेक्षकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे संगणकाशी संबंधित मूलभूत कौशल्ये देखील असली पाहिजेत. उमेदवार भरती अधिसूचनेमधून पात्रतेशी संबंधित इतर तपशील देखील तपासू शकतात.
advertisement
आधार ऑपरेटर, पर्यवेक्षकाची ही रिक्त जागा एका वर्षाच्या करारावर भरली जात आहे. जर आपण पगाराबद्दल बोललो तर निवडलेल्या उमेदवारांचे वेतन राज्याने ठरवलेल्या मानकांनुसार दिले जाईल. मिळालेल्या माहीतीनुसार, वर्षाला 2,10,000 पॅकेज दिले जाते. या आधार भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 11:48 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
CSC Aadhar Recruitment 2025: तरूणांना आधारमध्ये नोकरीची संधी! महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये भरती, अर्ज कसा आणि कुठे कराल?


