Govt job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता फक्त दहावी पास; पगार 69,100 रुपये, जाणून घ्या सर्व प्रक्रिया एका क्लिकवर

Last Updated:

दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सिलेक्शन झाल्यास तुम्हाला 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

News18
News18
CRPF Recruitment 2023 Notification : तुम्हालाही जर केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून एसएससी जीडी अंतर्गत कॉन्स्टेबलच्या पदांसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतात. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या भरती प्रक्रियेला 24 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून एसएससी जीडी अंतर्गत एकूण 3337 कॉन्स्टेबलची पदं भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्व प्रथम संगणकावर परीक्षा होईल, त्यानंतर शारीरीक चाचणी होणार आहे. या दोन परीक्षेनंतर मेरिटच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डामधून दहावीची परीक्षा पास झालेले असणं आवश्यक आहे. तसेच या पदासाठी जे शारीरीक मापदंड ठरवून देण्यात आले आहेत, त्याची पूर्तता तुम्ही करणं आवश्यक आहे.
advertisement
तुमची एसएससी जीडी अंतर्गत कॉन्स्टेबलच्या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला 21,700 रुपये ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तुम्ही एसएसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरण्यानंतर परीक्षेची तारीख घोषीत करण्यात येईल. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असणार आहे. ही परीक्षा संगणकावर होईल. तुम्हाला तिथे जनरल नॉलेजवर आधारित वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले जातील. यामध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांची शारीरीक चाचणी होईल, यामधून मेरिटच्या आधारावर उमेदवाराची निवड होईल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Govt job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता फक्त दहावी पास; पगार 69,100 रुपये, जाणून घ्या सर्व प्रक्रिया एका क्लिकवर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement