India Post Recruitment 2025: भारतीय टपाल विभागात 25,000 पदांची मेगाभरती! अर्ज कुठे आणि कसा कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
India Post GDS Recruitment 2025 : भारतीय टपाल विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. टपाल विभागाने तब्बल 25,000 पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे यातील निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे, म्हणजेच त्यात कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
मुंबई : भारतीय टपाल विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. टपाल विभागाने तब्बल 25,000 पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे यातील निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे, म्हणजेच त्यात कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
पदांची नावे
पोस्टमन
ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)
मेल गार्ड
मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
सहाय्यक अधीक्षक
पात्रता काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य असले पाहिजेत. याशिवाय, उमेदवारांना संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
advertisement
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी अर्ज करणे सोपे आणि सरळ आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा लागेल. निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असल्याने, उमेदवारांची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
अर्जाची मुदत किती?
सदर उमेदवार 3 मार्च 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
advertisement
पगार किती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीचा पगार दरमहा 10,000 रुपये असेल आणि नंतर अनुभवानुसार तो वाढेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
India Post Recruitment 2025: भारतीय टपाल विभागात 25,000 पदांची मेगाभरती! अर्ज कुठे आणि कसा कराल?


