MAHAGENCO Recruitment 2025 : तरूणांना महाजेनकोमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 50,000 ते 1,20,000 रुपये पगार, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
career news: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ या पदांसाठी एकूण 173 जागा भरल्या जाणार आहेत.
एकूण पदसंख्या
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ - 03
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ - 19
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ - 27
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - 75
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ - 49
एकूण - 173
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय?
या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे इच्छुकांनी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
सर्वप्रथम महाजेनकोच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. नंतर भरतीसंबंधीच्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करून अर्ज भरा आणि आवश्यक माहिती टाका.अर्ज शुल्क भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
advertisement
अधिकृत जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर (www.mahagenco.in) जाऊन संपूर्ण जाहिरात पाहता येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख - 12 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 12 मार्च 2025
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
MAHAGENCO Recruitment 2025 : तरूणांना महाजेनकोमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 50,000 ते 1,20,000 रुपये पगार, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या


