गॅरेजवाल्याच्या दोन्ही लेकी मंत्रालयात अधिकारी झाल्या, संजीवनी-सरोजिनीच्या जिद्दीची कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
संजीवनी आणि सरोजिनी या सख्या बहिणीने एमपीएससी परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : घरचे अठराविश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलाचा गॅरेजचा तोडका-मोडका व्यवसाय, सहा माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड, जिथे घर चालविण्याची चिंता तिथे मुला-मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढनिश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारणा मधील आठ पत्र्याच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या दोन सख्या बहिणींची नावे आहेत. तर वडील ज्योतीराम भोजने हे पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक वडीलांचे नाव आहे. आई, वडील आणि भावाने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले.
advertisement
ज्योतीराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत ओरोंडो प्राथमिक शाळेत झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रामध्ये जम बसवला. ज्योतीराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या दोन मुली आणि श्रीनिवास हा एक मुलगा आहे. ज्योतीराम ज्या घरात राहतात ते घर आठ पत्र्याचे असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे.
advertisement
ज्योतीराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या खचून गेले होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा असाच प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. परंतु दोन्ही मुलींनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी हिने बी.कॉम. नंतर 2018 सालीपासून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली.
advertisement
सात वर्षाच्या कालावधीत तीन वर्षे कोरोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली. या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या. परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई-वडिलांना दाखवून दिले नाही. संजीवनी आणि सरोजिनी ह्या दोघी सख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या. आणि त्या दोघींनी सुद्धा एमपीएससी मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला.
advertisement
संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा सात वर्षात एकूण सहा एमपीएससीच्या मेन्स परीक्षा दिल्या. परंतु या सर्व वेळी त्यांना पॉईंटमुळे मागे पडावे लागत होते. मात्र जिद्द सोडली नाही. अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली. आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कामगार वस्तीत अठराविश्व दारिद्र्य आणि गॅरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकविण्याचा आनंद आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सख्खा भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कशा पडूच शकत नाहीत, याची अनुभूती या निमित्ताने दिसून आली आहे.
advertisement
आई-वडिलांचे प्रयत्न आणि सख्या भावाची जिद्द असल्यामुळेच आज आम्ही दोघींनी एमपीएससीमध्ये यशाचा झेंडा रोवला आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा केवळ आणि केवळ सामाजिक कार्य करण्याच्या अनुषंगाने आणि आई-वडील व भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून व अभ्यास करून परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे. याचा मनोमन आनंद वाटतो. तीन वेळा पीएसआयची परीक्षा दिली. एक वेळा सेल्स टॅक्स तर एकदा टॅक्स असिस्टंट पदासाठी परीक्षा दिली. मात्र पॉईंटमध्येच माघार पडले. परंतु अपयश पदरी येऊन सुद्धा खचलो नाही. आणि अखेर मंगळवारी आनंदाचा दिवस उजाडला. एमपीएससी उत्तीर्ण झाले असून मंत्रालय महसूल विभागात क्लार्क म्हणून आपणास पोस्ट मिळणार आहे. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो तरी गरिबी विसरणार नसल्याचे संजीवनी ज्योतीराम भोजने हिने सांगितले.
advertisement
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री साडेआठ वाजता जाहीर झाला. या परीक्षेत दोन्ही बहिणींनी उत्तम गुण मिळवून यशाची यश मिळवलं. त्यांच्या आई-वडिलांच्या मेहनतीला फळ मिळाले. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो तरी गरिबी विसरणार नसल्याचे संजीवनी ज्योतीराम भोजने हिने सांगितले. त्यांच्या या यशाचे संपूर्ण सोलापुरात कौतुक होत आहे.
view comments
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 12, 2025 9:40 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
गॅरेजवाल्याच्या दोन्ही लेकी मंत्रालयात अधिकारी झाल्या, संजीवनी-सरोजिनीच्या जिद्दीची कहाणी

