Pune Mahanagarpalika Recruitment 2025 : विनापरीक्षा पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 80,000 रूपये पगार, अर्ज कसा कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career News : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika Recruitment 2025) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसंदर्भातील महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे 'वरिष्ठ निवासी', 'शिक्षक', आणि 'कनिष्ठ निवासी' अशा एकूण 29 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
पुणे : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika Recruitment 2025) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसंदर्भातील महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे 'वरिष्ठ निवासी', 'शिक्षक', आणि 'कनिष्ठ निवासी' अशा एकूण 29 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजित वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण रिक्त पदे
वरिष्ठ निवासी - 15 पदे
शिक्षक - 02 पदे
कनिष्ठ निवासी - 12 पदे
शैक्षणिक पात्रता काय?
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. अधिक तपशीलांसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय?
जाहिरातील दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांचे वय 38 ते 45 वर्षांपर्यंत असावे.
पगार किती?
वरिष्ठ निवासी - 80,250 रु. प्रतिमाह
advertisement
शिक्षक - 64,551 रु. प्रतिमाह
कनिष्ठ निवासी -64,551 रु. प्रतिमाह
निवड प्रक्रिया कशी केली जाणार?
view commentsउमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011 या पत्त्यावर 13 फेब्रुवारी रोजी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि आवश्यक प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तसेच अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Pune Mahanagarpalika Recruitment 2025 : विनापरीक्षा पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 80,000 रूपये पगार, अर्ज कसा कराल?


