Success Story : क्लास न लावता, पंचर दुकानात काम करणाऱ्या सुरजनं नेव्ही परीक्षेत मिळवलं यश
- Published by:Devika Shinde
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
दोन महिन्यांपूर्वी त्यांनी नेव्हीची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल सोमवारी लागला आणि त्यात त्यांनी यश मिळवलं आहे.
इरफान पटेल- प्रतिनिधी, सोलापूर :
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील सामान्य कुटुंबातील सुरज महादेव मोटे यांनी कुठलाही क्लास न लावता आणि प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय नेव्हीच्या एस.एस.आर पदावर निवड मिळवली आहे. आपल्या पंचर दुकानात काम करत त्यांनी हा यशस्वी प्रवास केला आहे, त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सुरजने 12वी सायन्सपर्यंत शिक्षण घेतले असून, नेव्ही परीक्षेची तयारी करत त्यांनी आपले कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने नेव्हीची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल सोमवारी लागला आणि त्यात त्याने यश मिळवलं आहे. ज्यामुळे गावातील लोक आणि मित्र परिवाराने त्याचा सत्कार केला आहे.
advertisement
सुरजचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण कोरवली येथील देशमुख प्रशाला येथे झाले आहे. परीक्षेची तयारी करत असताना सुरज आपले पंचर दुकानही सांभाळत होता. पहाटे पाच वाजता उठून तो सकाळी आठपर्यंत अभ्यास करत असत, त्यानंतर दुकानात काम करत आणि दुपारी कॉलेजला जात असत. मागील चार वर्षांपासून त्याने या परीक्षेची तयारी केली आहे, ज्यात त्याला त्याच्या मामाचे मार्गदर्शन मिळाले.
advertisement
सध्या, सुरज सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी लवकरच ओडिसाला जाणार आहेत. पंचर दुकान सांभाळत त्याने मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी गौरवाचं ठरले आहे. सुरजच्या आई-वडिलांसह नातेवाईक आणि गावकरी या आनंदात सहभागी झाले आहेत. आता सुरज संपूर्ण गावात आणि आजूबाजूच्या परिसरात प्रेरणा बनला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 24, 2024 4:35 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : क्लास न लावता, पंचर दुकानात काम करणाऱ्या सुरजनं नेव्ही परीक्षेत मिळवलं यश

