वडील मंत्री, पती उद्योगपती, पण त्या एका दुर्घटनेनं बदललं आयुष्य, आज महिला आहे यशस्वी उद्योजक

Last Updated:

प्रेमलता देवी यांनी सांगितले की, एक वेळ अशी आली की जेव्हा त्यांचे पती प्रेम कुमार सिंह यांचा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले.

अगरबत्ती उद्योग
अगरबत्ती उद्योग
नीरज कुमार, प्रतिनिधी
बेगूसराय, 10 ऑक्टोबर : संघर्ष केला तर कोणाचेही आयुष्य बदलू शकते, हे प्रेमलता यांनी सिद्ध केले आहे. प्रेरणा अगरबत्ती या उद्योगसमूहाच्या प्रेमलता देवी यांची कहाणी खूपच संघर्षपूर्ण राहिली आहे. प्रेमलता देवी यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही संघर्ष करत संकटांवर मात करत एक यशस्वी उद्योजक बनून दाखवले आहे.
प्रेमलता देवी या बिहार सरकारमधील माजी मंत्री रामदयाल मेहता यांच्या कन्या आहेत. नालंदा जिल्ह्याच्या हरनौत जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रेमलता कुमारी यांचे लग्न बेगूसराय येथील प्रेम कुमार सिंह यांच्याशी झाले होते. त्यांचे पतीही उद्योगपती होते. घरासमोर दोन-चार वाहनेही होती. आर्थिकदृष्ट्या त्या संपन्न होत्या. मुलेही चांगल्या शाळेत शिकत होती. त्यांचे आयुष्य आनंदात सुरू होते. मात्र, एका घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.
advertisement
प्रेमलता देवी यांनी सांगितले की, एक वेळ अशी आली की जेव्हा त्यांचे पती प्रेम कुमार सिंह यांचा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर घराची आर्थिक स्थिती इतकी बिकट नाही झाली. मात्र, काही महिन्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा त्यांच्या पतीचा अपघात झाला. या रस्ते अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि एक वर्ष एका खासगी रुग्णालयात कोमामध्ये राहिले.
advertisement
या दरम्यान, त्यांच्या पतीचेही निधन झाले. यानंतर त्यांच्यावर आर्थिक संकटही कोसळले. दररोज रुग्णालयाच्या खर्चासाठी त्यांना त्यांची संपत्ती विकावी लागली. मात्र, अशा परिस्थितीतही प्रेमलता या खचल्या नाहीत आणि त्यांनी संघर्ष करत अगरबत्तीची फॅक्टरी सुरू केली.
कर्ज काढून सुरू केला उद्योग -
आपल्या आयुष्यातील संघर्षाबाबत त्या सांगतात की, 5 वर्षांपूर्वी जीविकासोबत जोडले गेल्यानंतर त्यांनी यूकोआरसिटीकडून अगरबत्ती निर्मितीचे 35 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जीविकाकडून 40 हजार रुपये कर्ज घेतले आणि अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांची चांगली विक्री होऊ लागली. आज ते पाच महिलांना दररोज 200 रुपये देऊन अगरबत्ती बनवत आहेत आणि याच माध्यमातून प्रेमलता देवींनी आपल्या मेहनतीने 40 हजार रुपयांच्या भांडवलाला 5 वर्षात 5 लाखांच्या पुढे नेले आहे.
advertisement
1 लाखांपेक्षा जास्त कमाई -
प्रेमलता यांनी सांगितले की, प्रेरणा आणि रामायण अगरबत्ती तयार करतात. अगरबत्तीची किंमत 10 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत आहे. ही अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहे. तसेच बिहारच्या विविध जिल्ह्यांव्यतिरिक्त ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट, मिसोवरही उपलब्ध आहे. त्या एका महिन्यात 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अगरबत्ती तयार करतात. या माध्यमातून त्यांना 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. संघर्ष केला तर कोणाचेही आयुष्य बदलू शकते, हे प्रेमलता यांनी सिद्ध केले आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
वडील मंत्री, पती उद्योगपती, पण त्या एका दुर्घटनेनं बदललं आयुष्य, आज महिला आहे यशस्वी उद्योजक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement