रस्त्याने चालत होती, अचानक अंगावर आली बस, जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न, 5 सेकंदात सगळं संपलं

Last Updated:

ST Bus Hits Woman: यवतमाळ बस स्थानकावर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेला एसटीने चिरडलं आहे.

News18
News18
भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ: यवतमाळ बस स्थानकावर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेला एसटीने चिरडलं आहे. संबंधित महिला रस्त्याने चालत जात होती. यावेळी बस चालकाने निष्काळजीपणाने एसटी चालवली. या दुर्घटनेत ६५ वर्षीय महिलाचा करुण अंत झाला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ताई देवसिंह चव्हाण असं मृत पावलेल्या ६५ वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या यवतमाळच्या परिजात सोसायटीत राहायला होत्या. घटनेच्या दिवशी त्या यवतमाळ बस स्थानक परिसरात कामानिमित्ताने गेल्या होत्या. यावेळी त्या बस स्थानक परिसरातून जात असताना त्यांना एसटीने चिरडलं आहे. ही बस यवतमाळ आगाराची असून ती यवतमाळवरून पुलगावच्या दिशेनं जाणार होती.
घटनेच्या वेळी चव्हाण या पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून बस आली. बसला पाहून चव्हाण यांनी वेगाने बाजुला होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं वय अधिक असल्याने त्यांना तातडीने बस समोरून बाजुला होता आलं नाही. त्यांनी बस समोरून दूर जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बसची धडक बसून त्या बसच्या डाव्या बाजुच्या पहिल्या चाकाखाली आल्या. यावेळी दुसऱ्या एका महिलेनं आरडाओरड करून बसला थांबवलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांच्या अंगावरून चाक गेलं. अवघ्या पाच सेकंदात हा सगळा प्रकार घडला
advertisement
या अपघातानंतर चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर इथं हलवण्यात आलं. नागपूरमध्ये उपचारादरम्यान चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
रस्त्याने चालत होती, अचानक अंगावर आली बस, जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न, 5 सेकंदात सगळं संपलं
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement