Mumbai: मद्यधुंद असल्याचं पाहून साधला डाव, अलिबागमध्ये ऑफिस पार्टीत तरुणीवर अत्याचार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Alibaug: ऑफिस पार्टीसाठी अलिबागमध्ये गेलेल्या तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे.
मोहन जाधव, प्रतिनिधी रायगड: रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी ऑफिस पार्टीसाठी अलिबागला गेली होती. यावेळी पार्टीत तिने मद्य सेवन केलं होतं. यानंतर ऑफिसमधील एका सहकाऱ्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
अभिषेक सावडेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याने आपल्या ऑफीसमध्ये काम करणाऱ्या सहकारी तरुणीवर अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका कंपनीने अलिबागमध्ये ऑफिस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना आमंत्रण देण्यात आलं होतं. अलिबागला आलेल्या या ग्रुपमधील महिला कर्मचाऱ्यावर तिचाच ग्रुप मेंबर असलेल्या अभिषेक सावडेकर या तरुणाने जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले.
advertisement
या घटनेची अधिक माहिती अशी की, घटनेच्या रात्री पीडित तरुणीने अलिबागमधील पार्टीत मद्यसेवन केलं होतं. दारुची नशा चढल्यानंतर ती हॉटेलमध्येच झोपी गेली. मात्र तिच्या नशेचा फायदा घेत अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील अलास्का व्हिला मध्ये तिच्याच ग्रुप मेंबर सदस्याकडून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
सकाळी जेव्हा ही तरुणी शुद्धीवर आली, तेव्हा ही बाब तिच्या लक्षात आली. या संदर्भात या तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी अधिक तपास केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण तिच्या रूममधून बाहेर आल्याचे निदर्शनास आलं. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता तपासादरम्यान या व्यक्तीने अत्याचाराची कबुली दिली. अभिषेक सावडेकर असं या आरोपीचे नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Alibag,Raigad,Maharashtra
First Published :
Jul 04, 2025 8:34 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Mumbai: मद्यधुंद असल्याचं पाहून साधला डाव, अलिबागमध्ये ऑफिस पार्टीत तरुणीवर अत्याचार











