प्रेमाचा भयानक शेवट! आधी एकाच गाडीत फिरले, मग प्रेमी युगुलाने चिरला एकमेकांचा गळा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एका प्रेमी युगुलाने चाकूने एकमेकांचा गळा चिरला. या हृदयद्रावक घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला असून प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.
जयपूर 03 ऑक्टोबर : राजधानी जयपूरमध्ये प्रेमाची एक भयानक कहाणी समोर आली आहे. यात एका प्रेमी युगुलाने चाकूने एकमेकांचा गळा चिरला. या हृदयद्रावक घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला असून प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटना पाहून थक्क झाले. जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जयपूर शहरातील हरमदा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. येथे लोहा मंडई रोडवर एका तरुण आणि तरुणीने चाकूने एकमेकांचा गळा चिरला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. दरम्यान कोणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ते दोघंही एकाच गाडीतून लोहा मंडीत आले होते, असं सांगण्यात येत आहे. चाकूने गळा कापल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. ज्योती असं मृत तरुणीचं नाव आहे. तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.
advertisement
घटनेची माहिती मिळताच हरमदा पोलीस ठाण्याचे प्रभारी हिम्मत सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. गंभीर जखमी तरुणाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमप्रकरणातून झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेचं कारणं अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनीही आत्महत्या केली की आणखी काही घटना घडली, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
विशेष म्हणजे प्रेमप्रकरणाशी संबंधित अशा अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राजस्थानमध्ये यापूर्वीही अनेकदा समोर आल्या आहेत. अलीकडेच जयपूरमध्ये एका प्रेयसीने प्रियकराच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर प्रेयसीने पळ काढला. दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली. तोपर्यंत प्रियकराचा मृतदेह खोलीत पडून होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेयसीला बिहारमधून अटक केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2023 2:59 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमाचा भयानक शेवट! आधी एकाच गाडीत फिरले, मग प्रेमी युगुलाने चिरला एकमेकांचा गळा