UPI Fraud: सावधान! सायबर गुन्हेगारांनी शोधलीय नवी टेक्निक, संपूर्ण बँक खातंच करतात रिकामं, जाणून घ्या नवी पद्धत्त
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
UPI Jumped Deposit Scam: ‘जम्प टेक्निक’ नावाच्या नवीन सायबर फसवणुकीत UPI वापरकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. चोर 2000 रुपये खात्यात टाकून व्यवहार सुरू करतात आणि पिन टाकल्यावर मोठी रक्कम काढतात.
मुंबई: आजकाल सायबर फसवणूक करणाऱ्यांनी ‘जम्प टेक्निक’ नावाची एक नवी फसवणूक सुरू केली आहे. यात UPI वापरणाऱ्या लोकांना टार्गेट केले जाते. या फसवणुकीद्वारे फक्त काही मिनिटांत तुमचे संपूर्ण खाते रिकामे करू शकतात. तुम्हीही या फसवणूच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचू इच्छित असाल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा.
जम्प टेक्निक म्हणजे काय?
या फसवणुकीमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती सर्वप्रथम तुमच्या खात्यात 2000 रुपये इतकी छोटी रक्कम जमा करतो. ही रक्कम तुमच्या खात्यात खरोखर जमा होते आणि तुम्हाला त्याची माहिती देणारा मेसेज किंवा नोटिफिकेशन देखील मिळते. पण खरा खेळ यानंतर सुरू होतो. फसवणूक करणारा व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या तुमच्या खात्यातून पैसे परत काढण्यासाठी एक सिस्टम सेट करतो. तुम्ही तुमच्या UPI एपवर बॅलन्स तपासण्यासाठी गेलात आणि पिन टाकल्यावर त्याच वेळी तुमच्या खात्यातून फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात मोठी रक्कम ट्रांसफर होते.
advertisement
या फसवणूकाला कसा सामना द्यायचा?
- तुमच्या खात्यात कोणत्याही अपेक्षेशिवाय जर कोणतीही रक्कम जमा झाली असेल आणि ती अनोळखी नंबरवरून आली असेल तर ताबडतोब सावध व्हा.
- UPI वर बॅलन्स तपासण्यापूर्वी जाणीवपूर्वक एकदा चुकीचा पिन टाका. असे केल्याने फसवणूक करणाऱ्याने सेट केलेली ऑटोमॅटिक विथड्रॉल सिस्टम रद्द होईल.
- तुमचे बँक खाते आणि UPI एप सुरक्षित ठेवण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजेवर कधीही विश्वास ठेवू नका.
advertisement
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुम्ही अशा फसवणूची बळी पडलात तर ताबडतोब 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. ही महत्वाची माहिती तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. अशा प्रकरणांमध्ये सतर्कता खूप महत्त्वाची असते. आपण ज्या प्रकारे Digitization (डिजिटलायझेशन) कडे वाटचालो आहोत, त्याचप्रमाणे फसवणूक करण्याच्या नवीन पद्धतीही वाढत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
UPI Fraud: सावधान! सायबर गुन्हेगारांनी शोधलीय नवी टेक्निक, संपूर्ण बँक खातंच करतात रिकामं, जाणून घ्या नवी पद्धत्त








