पोरगी पाहिली लेकाला अन् प्रेम झालं बापाला, लग्नाची तयारी सुरू असताना घेऊन पळालं म्हातारं!

Last Updated:

हा सासरा मुलाच्या सासुरवाडीत अनेक दिवस रहायला लागला. ही व्यक्ती ज्येष्ठ असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना फारसा विरोध केला नाही.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
रामपूर : हिंदी चित्रपटात किंवा दैनंदिन आयुष्यातही अनेकदा आपण वयस्कर व्यक्ती प्रेमात पडल्याचं पाहतो ऐकतो. पण साधारणपणे हे प्रेम समवयस्काशी असतं. सध्या ज्येष्ठ नागरिक जोडीदाराच्या मृत्यूनंतर पुढील आयुष्यात साथ मिळावी म्हणून दुसरं लग्न करतात. हे लग्न त्याच वयाच्या वधूशी असतं. पण उत्तर प्रदेशात विचित्र प्रकार घडला आहे. आपल्याच भावी सुनेच्या प्रेमात एक सासरा पडला आणि त्याने चक्क आपल्या मुलाचीच वाग्दत्त वधू पळवली.
उत्तर प्रदेशातील रामपूरमधील चमरौआ भागात राहणाऱ्या एका वृद्धाने आपल्या मुलाचं लग्न विकासखंड सैदनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीशी ठरवलं होतं. या घटनेला दोन वर्षं झाली. लग्न ठरल्यानंतर हा सासराच त्याच्या मुलाच्या भावी सासुरवाडीच्या घरी सारखा जायला लागला. या तरुणाने आणि त्याच्या कुटुंबियांनी आपल्या वडिलांना दररोज भावी मुलीच्या घरी जाण्यापासून रोखण्याचा अतोनात प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही.
advertisement
हा सासरा मुलाच्या सासुरवाडीत अनेक दिवस रहायला लागला. ही व्यक्ती ज्येष्ठ असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना फारसा विरोध केला नाही. एका महिन्यापूर्वी मुलाने जबरदस्तीने आपल्या वडिलांना घरी नेलं आणि त्यांना कोंडून ठेवलं. आईला पहाऱ्याला बसवलं होतं.
तीन दिवसांपूर्वी सासऱ्याने घरून पळून जाऊन भावी सुनेचं घर गाठलं. घरी भांडण झाल्याने आल्याचं त्याने सांगितलं त्यामुळे कुटुंबियांनी त्याला ठेवून घेतलं. पण सासरा आणि त्यांची तरुण मुलगी यांना शारीरिक संबंध ठेवताना बघितल्यावर मात्र ते भडकले. त्यांनी मुलाच्या कुटुंबियांना कळवलं. पण मुलगा आणि त्याची आई मुलीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच सासरा आपल्या सुनेला घेऊन तिथून पळून गेला होता. दोन्ही कुटुंबियांनी या दोघांचा खूप शोध घेतला आणि नंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या विचित्र प्रकाराची चर्चा सगळ्या परिसरात सुरू आहे.
advertisement
समाजात विविध घटना घडत असतात. त्यांच्याबद्दल चर्चाही होते. समाजाचे नियम पाळण्याचं बंधन सगळ्यांवर असतं, त्याला नैतिकता म्हणतात. पण सध्या अशा विचित्र घटना घडल्याचं ऐकायला मिळतं. पोलीस पुढील तपास करत आहेत आणि ते योग्य ती कारवाई करतील.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पोरगी पाहिली लेकाला अन् प्रेम झालं बापाला, लग्नाची तयारी सुरू असताना घेऊन पळालं म्हातारं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement