Crime News : घटस्फोटीत प्रेयसीच्या घरी तरुणाचा अचानक मृत्यू; अपघात की घातपात? पोलीसही बुचकळ्यात
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
आजकाल एखाद्या व्यक्तीचा कधी आणि कसा मृत्यू होईल, हे सांगता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला की, तो मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जातात.
मुंबई : आजकाल एखाद्या व्यक्तीचा कधी आणि कसा मृत्यू होईल, हे सांगता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला की, तो मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जातात. उत्तर प्रदेशात मेरठमध्ये असंच प्रकरण घडलं आहे. मेरठमधल्या लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीतल्या किडवईनगरमध्ये घटस्फोटित प्रेयसीच्या घरी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून प्रेयसीवर खुनाचा आरोप केला आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षांचा इरफान नफीस कासार (रिहान गार्डन, लिसाडी गेट) हा गॅस शेगडी दुरुस्त करण्याचं काम करायचा. इरफानचा भाऊ फुरकान याने दिलेल्या माहितीनुसार, इरफानचे किडवईनगरातल्या गल्ली क्रमांक तीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही महिला घटस्फोटित आहे आणि ती आपला मुलगा व मुलीसोबत राहते.
बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास इरफान त्याच्या प्रेयसीच्या घरी गेला होता. गुरुवारी सकाळी सहा वाजता प्रेयसीने इरफानचा भाऊ फुरकान याला त्याच्या मृत्यूची माहिती दिली. हृदयविकाराच्या झटक्याने इरफानचा मृत्यू झाल्याचं तिने सांगितलं. यानंतर संतप्त कुटुंबीय महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा खोलीत इरफानचा मृतदेह पडलेला होता. महिलेने इरफानचा खून केल्याचा आरोप करून कुटुंबीयांनी घटनास्थळी गोंधळ घातला.
advertisement
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कुटुंबीयांना शांत केलं. प्राथमिक पाहणीत इरफानच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा हल्ल्याचे चिन्ह आढळले नाहीत. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीओ कोतवाली आशुतोष कुमार यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. त्यामुळे व्हिसेरा सुरक्षित करण्यात आला आहे. पोलिसांनी इरफानच्या कथित प्रेयसीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. नंतर तिची सुटका करण्यात आली. इरफानच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्याविरोधात पोलीस तक्रार दिलेली नाही.
advertisement
शवविच्छेदनानंतर इरफानचा मृतदेह घरी आला तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. इरफानचे कुटुंबीय गोंधळ घालू शकतात, अशी माहिती कोणी तरी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीसही तिथे गेले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास इरफानच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
view commentsLocation :
Meerut,Uttar Pradesh
First Published :
January 27, 2024 7:43 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : घटस्फोटीत प्रेयसीच्या घरी तरुणाचा अचानक मृत्यू; अपघात की घातपात? पोलीसही बुचकळ्यात


