लग्न करण्याची हौस लय भारी; 9 बायका पळून गेल्या, दहाव्या बायकोवर ओढावलं भयंकर संकट, अंगावर शहारे येतील
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
जशपूरमध्ये धुला राम नावाच्या व्यक्तीने तब्बल 10 विवाह केले. पण अखेर दहाव्या पत्नीस संशयाच्या भरात ठार मारले. जंगलात लपवलेला तिचा कुजलेला मृतदेह उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
जशपूर (छत्तीसगड) : जशपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. येथील धुला राम नावाच्या व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल दहा विवाह केले. पण एवढ्या लग्नांनंतरही त्याचे संसार टिकले नाहीत. प्रश्न असा निर्माण झाला की असे कसे घडले? तुम्हाला हा अजब प्रकार वाटेल पण याचा शेवट भयानक असा आहे.
advertisement
धुला राम हा जशपूर जिल्ह्यातील सुलेसा गावचा रहिवासी आहे. स्वतःचं कुटुंब असावे या इच्छेतून त्याने गेल्या दहा वर्षांत नऊ वेळा विवाह केले. परंतु त्याचे एकही लग्न यशस्वी झाले नाही. प्रत्येक वेळेस पत्नी त्याला सोडून निघून गेली. कारण तो पत्नीवर संशय घ्यायचा, तिला मारहाण करायचा. परिणामी कोणताही संसार सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकला नाही. शेवटी त्याच्या आयुष्यात दहावी पत्नी आली आणि तो दहाव्यांदा वर झाला. पण या दहाव्या पत्नीसोबत जे काही घडलं ते ऐकून सर्वांच्या अंगावर शहारे येतील.
advertisement
दहाव्या पत्नीची निर्घृण हत्या
धुला राम आणि त्याची पत्नी एका लग्नाला गेले होते. तेथे धुला रामला संशय आला की त्याच्या पत्नीने लग्नातील तांदूळ, स्वयंपाकाचे तेल आणि एक साडी चोरली आहे. या संशयावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की संतापाच्या भरात धुला रामने दगडाने तिच्या डोक्यावर वार करून पत्नीची हत्या केली.
advertisement
पत्नीची हत्या केल्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी धुला रामने जंगलातल्या सुक्या पानांखाली मृतदेह लपवला. तब्बल चार दिवस तो मृतदेह जंगलातच पडून राहिला आणि कुजल्यामुळे दुर्गंधी पसरू लागली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता धुला रामने अखेर आपला गुन्हा कबूल केला.
advertisement
ही घटना समजताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 6:08 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्न करण्याची हौस लय भारी; 9 बायका पळून गेल्या, दहाव्या बायकोवर ओढावलं भयंकर संकट, अंगावर शहारे येतील