नाशकात चोरट्यांनी चक्क 'बँके'ला गंडवलं; तो एक कागद अन् लाखोंचा खेळ, सगळेच चक्रावले

Last Updated:

फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल झाले आहेत.

News18
News18
नाशिक : शहरात फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बँका, सर्वसामान्य नागरिक आणि पालकांना लक्ष्य करण्यात आले असून, एकूण 1 कोटी 10 लाख 96 हजार 870 रुपयांचा अपहार झाला आहे. यात सर्वाधिक फटका नामको बँकेला बसला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज लाटणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
नामको बँकेत कागदपत्रांचा फेरफार; सव्वा कोटींचे वाहन कर्ज लाटले
नामको बँकेतून वाहन तारण कर्ज मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे सहा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात 1 कोटी 9 लाख 47 हजार 370 रुपयांची फसवणूक झाली आहे. तर संशयित आरोपी स्वाती शिंदे, वसीम शेख, सचिन जाधव, संकेत घावटे, जुबेर शेख, गोरक्ष मोरे, रजियाबी शेख, असलम शेख, सुमित फड, उद्धव गवळी, सागर फड, शरद घरटे, मोहित अग्रवाल, निसार अहमद, खंडेराव झनकर, दिनेश शिंदे, गुलाम हैदर, सुनील फटके यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
advertisement
नामवंत शाळेत प्रवेश मिळवून देतो सांगून लाखाची लूट
मुलाला नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पालकाची 1 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. भुपाल काळू जाधव (रा. डीजीपी नगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पैसे देऊनही प्रवेश मिळाला नाही आणि संशयिताने पैसे परत करण्यासही नकार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
एटीएम कार्डची अदलाबदल; महिलेला 50 हजारांचा फटका
नाशिकरोड येथील मुक्तीधाम परिसरातील एसबीआय एटीएममध्ये एका महिलेची हातचलाखीने फसवणूक करण्यात आली. रुख्मिणी सूर्यवंशी (38) या पैसे काढण्यासाठी गेल्या असता, पाठीमागे उभे असलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचा पिन चोरून पाहिला. तुमचे कार्ड मशिनमध्ये नीट बसले नाही, असे भासवून आरोपीने त्यांचे मूळ कार्ड लंपास केले आणि दुसरे बनावट कार्ड हातात दिले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून 49 हजार 500 रुपये लंपास करण्यात आले. नाशिकरोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
फसवणुकीचे आठ गुन्हे एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली असून. सतर्कतेचा इशारा देत बँकिंग व्यवहार करताना अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका आणि कर्ज प्रकरणांसाठी केवळ अधिकृत कागदपत्रांचाच वापर करा, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
नाशकात चोरट्यांनी चक्क 'बँके'ला गंडवलं; तो एक कागद अन् लाखोंचा खेळ, सगळेच चक्रावले
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement