advertisement

टीप मिळताच पोलिसांची फिल्डिंग, माजी नगरसेवकाचा बॉडी बिल्डर मुलगा अडकला जाळ्यात, थारमध्ये नको तेच सापडलं

Last Updated:

Crime in Nagpur: नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे पोलिसांनी सापळा रचून माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक केली आहे.

News18
News18
नागपूर: नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे पोलिसांनी सापळा रचून माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक केली आहे. संबंधित आरोपी भल्या पहाटे आपल्या थार गाडीने ड्रग तस्करी करायला चालला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एका माजी नगरसेवकाचा मुलगा अशाप्रकारे ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुंतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा बॉडी बिल्डर असून तो जिम ट्रेनरदेखील आहे. असं असूनही तो ड्रग्ज तस्करी करत इतरांच्या जीवाशी खेळत होता.
संकेत बुगेवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो माजी नगरसेवक अजय बुगेवार यांचा मुलगा आहे. पोलिसांनी एमडी तस्करी करताना त्याला रंगेहाथ अटक केली आहे. तो 'थार' या कारने एमडीची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
advertisement
आरोपी संकेत हा गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हेडाऊ रेस्टॉरंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी रात्रीपासूनच सापळा रचला होता. संकेत एमएच ४५ एव्ही ४५५४ ने जाधव चौकात पोहोचला. पोलिसांनी त्याला अडविले व त्याची तसेच कारची झडती घेतली. पोलिसांना त्याच्या खिशातून १६.०७ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पोलिसांनी १.६७ लाखांच्या एमडी पावडर सोबत १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आशीर्वादनगर येथील प्रणय बाजारे (२५) याने त्याला एमडी दिल्याचे संकेतने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली.
advertisement
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा असलेला संकेत हा बॉडी बिल्डर असून जिम ट्रेनरदेखील आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही एमडी तस्करांशी तो जोडला गेला होता. पोलीस त्याची सखोल चौकशी करत असून इतर कनेक्शन्स बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
टीप मिळताच पोलिसांची फिल्डिंग, माजी नगरसेवकाचा बॉडी बिल्डर मुलगा अडकला जाळ्यात, थारमध्ये नको तेच सापडलं
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement