असा हा राजाबाबू! कधी डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून त्याने 6 महिलांशी केलं लग्न, पण अखेर...

Last Updated:

न्यूरोसर्जन, लष्करात डॉक्टर किंवा पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचं भासवण्यासाठी या व्यक्तीने बनावट कागदपत्रं तयार केली होती.

(आरोपीला अखेर अटक)
(आरोपीला अखेर अटक)
कुपवाडा,18 डिसेंबर : मोठ्या पदावर काम करत असल्याचं किंवा अधिकारी असल्याचं भासवून लग्नासाठी महिलांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना वारंवार घडतात. ऑनलाइन पद्धतीचा यासाठी प्रामु्ख्याने वापर होतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण पोलिसांनी उजेडात आणलं असून, एका महाठगाला अटक केली आहे. ही व्यक्ती कधी न्यूरोसर्जन, डॉक्टर तर कधी पंतप्रधान कार्यालयातला अधिकारी असल्याचं भासवून महिलांची फसवणूक करत होती. काश्मीरमधल्या कुपवाडा इथल्या या व्यक्तीला ओडिशा पोलिसांनी वेश बदलून इतरांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी या व्यक्तीबद्दल दिलेल्या माहिती ऐकून थक्क व्हायला होईल. कधी न्यूरोसर्जन, कधी लष्करात डॉक्टर, तर कधी पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचं भासवून ही व्यक्ती इतरांची फसवणूक करत होती. आश्चर्याची बाब म्हणजे तो माणूस स्वतःला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा जवळचा सहकारी असल्याचं सांगत होता. हे सर्व समजल्यावर पोलीसही चक्रावून गेले आहेत.
advertisement
इतरांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सय्यद इशान बुखारी उर्फ इशान बुखारी उर्फ डॉ. इशान बुखारी याला ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ओडिशाच्या जयपूर जिल्ह्यातल्या नेउलपूर गावातून अटक केली. एसटीएफचे महानिरीक्षक जे. एन.पंकज म्हणाले, 'अनेक बनावट नावं धारण केलेल्या या व्यक्तीचे पाकिस्तानमधल्या अनेकांशी आणि केरळातल्या काही संशयित घटकांशी संबंध होते; पण पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिन्स अर्थात आयएसआयशी त्याचा संबंध असल्याचं आढळून आलं नाही.'
advertisement
काश्मीर पोलीस बुखारीच्या शोधात होते. फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांशी त्याचा संबंध होता. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट आधीच जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंजाब, काश्मीर आणि ओडिशातली संयुक्त पथकं त्याची चौकशी करतील.
advertisement
जे. एन. पंकज म्हणाले, की 'अनेक प्रकारे ओळख सांगणाऱ्या या व्यक्तीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, काश्मीरसह देशाच्या विविध भागांतल्या किमान सहा महिलांशी लग्न केलं. तसंच त्याचे अनेक महिलांशी प्रेमसंबंध होते. तो अनेक वेबसाइट्स आणि अ‍ॅप्सवर सक्रिय होता. लोकांची फसवणूक करण्यासाठी तो वेगवेगळी ओळख सांगत असे. आरोपीचे काही देशद्रोही घटकांशी संबंध होते;, मात्र त्याची नेमकी भूमिका काय याचा सखोल तपास केला जाईल.'
advertisement
'आमच्याकडे आरोपीच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. तो दहशतवादी कटात सामील असल्याबद्दल काहीही सांगणं खूप घाईचं आहे. परंतु, त्याचे पाकिस्तानशी काही संबंध होते आणि ते पडताळून पाहिलं जाईल. तो पाकिस्तानी गुप्तहेर होता हे आम्ही नाकारू शकत नाही; पण आतापर्यंत आमच्याकडे फारसे पुरावे नाहीत. तथापि, आम्ही एनआयएच्या संपर्कात आहोत,` असं जे. एन. पंकज यांनी सांगितल्याचं 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे.
advertisement
न्यूरोसर्जन, लष्करात डॉक्टर किंवा पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचं भासवण्यासाठी या व्यक्तीने बनावट कागदपत्रं तयार केली होती. त्याच्याकडे अमेरिकेतलं आयव्ही लीग कॉलेज, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचं वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आहे. डॉक्टर म्हणून आपली ओळख पटवण्यासाठी या ठगाने कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि तमिळनाडूतल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचं वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र बनवलं. फसवणूक करण्यासाठी, तसंच नवीन ओळख भासवण्यासाठी तो आंतरराष्ट्रीय पदवी, प्रतिज्ञापत्र, बाँड, एटीएम कार्ड, कोरे चेक्स, आधार कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड जवळ बाळगत असे. एसटीएफ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून 100हून अधिक कागदपत्रं आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस पथकं करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
असा हा राजाबाबू! कधी डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून त्याने 6 महिलांशी केलं लग्न, पण अखेर...
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement