मुख्यमंत्री शिंदेचा पीए बनवून गंडा घालणाऱ्या हितेशचा 3 वेळा पोलिसांना चकवा, चौथ्यांदा मैत्रिणीच्या फ्लॅटवर सापडला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हितेशने आमिषे दाखवत तब्बल १८ जणांना ५५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याचे भासवून रेल्वे विभागाचा मक्ता, म्हाडाचे फ्लॅट, रेल्वेत नोकरी, कंत्राट मिळवून देतो आदी आमिषे दाखवत तब्बल १८ जणांना ५५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. हितेश रमेश संघवी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला रविवारी मुंबईतील मैत्रिणीच्या भाड्याच्या फ्लॅटवरून ताब्यात घेतले. सोमवारी त्याला कोर्टात हजर केल्यावर ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
advertisement
या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याआधी पोलिसांनी त्याची पत्नी अर्पिता संघवीला मुंबईतून ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. हितेश मात्र बराच काळ पोलिसांना चकवा देत होता. त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. अखेर चौथ्या प्रयत्नात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कोर्टात कोठडीची मागणी करताना पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फसवणुकीतील काही रक्कम पत्नीच्या खात्यात जमा केली आहे, तर उर्वरित पैसे कुठे आहेत?, याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच त्याने वापरलेली कारचाही शोध घेणे बाकी असल्याने कोठडी गरजेची असल्याचे नमूद करण्यात आले.
advertisement
कोर्टात काय झालं?
संशयित हितेश संघवी यांच्या वकिलांनी मात्र, "कोणत्या अँगलने हितेश हा मुख्यमंत्र्यांचा पीए दिसतो?" असा प्रश्न उपस्थित करून, आम्हीही इतरांप्रमाणे फसवणुकीचा बळी ठरल्याचे सांगितले. तर हितेश संघवी याने आणखी काही जणांची फसवणूक केली आहे का?, याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 26, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मुख्यमंत्री शिंदेचा पीए बनवून गंडा घालणाऱ्या हितेशचा 3 वेळा पोलिसांना चकवा, चौथ्यांदा मैत्रिणीच्या फ्लॅटवर सापडला