'तुझ्यासह कुटुंबाला संपवेन', महिला IAS अधिकाऱ्याला डांबून मारहाण, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एका उच्चपदस्थ आयएएस (IAS) अधिकाऱ्याने आपल्या IAS पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका उच्चपदस्थ आयएएस (IAS) अधिकाऱ्याने आपल्या IAS पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयएएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तक्रारदार महिलाही अधिकारी आयएएस अधिकारी आहेत. पतीने आपल्याला दीर्घकाळापासून मारहाण केली असून बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली', असा गंभीर आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार महिला अधिकाऱ्याचं नाव भारती दीक्षित असून, त्या सध्या वित्त विभागाच्या संयुक्त सचिवपदी कार्यरत आहेत. तर, आरोपी पतीचं नाव आशीष मोदी असे असून ते सामाजिक न्याय व सबलीकरण विभागाचे संचालक आहेत. हे दोघेही २०१४ च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
भारती दीक्षित यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पती आशीष मोदी यांनी दीर्घकाळापासून माझा छळ केला आहे. 'तो मला वारंवार मारहाण करतो आणि त्याने मला घरात बेकायदा डांबून ठेवले होते', असेही त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. हा छळ केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, आरोपी पतीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याचंही दीक्षित यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरोधात कारवाई
या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत आयएएस अधिकारी आशीष मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरोधात त्यांच्याच पत्नीने छळ आणि जीवे मारण्याच्या धमकीसारखे गंभीर आरोप केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थान केडरच्या या दोन आयएएस अधिकाऱ्यांमधील कौटुंबिक वादाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
view commentsLocation :
Jaipur,Rajasthan
First Published :
November 12, 2025 7:44 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'तुझ्यासह कुटुंबाला संपवेन', महिला IAS अधिकाऱ्याला डांबून मारहाण, प्रशासकीय वर्तुळात खळबळ


