घराबाहेर बोलवलं अन् कोयत्याने गळ्यावर केले 12 वार, नागपुरात प्रेयसीच्या पतीला दोघांनी दिला भयंकर मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nashik: नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली आहे.
नागपूर: नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या एका साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने ११ ते १२ वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता, की प्रेयसीचा पती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला.
शेरा सूर्यप्रकाश मलिक असं हत्या झालेल्या 33 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर गीतेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे असं हत्या करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगलादेश वस्तीत नाईक तलाव परिसरात ही घटना घडली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पाचपावली पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे. अनैतिक संबंधातून शेराची हत्या झाल्याचं प्राथमिक कारण तपासात समोर आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गितेश उके याचे शेरा मलिकच्या पत्नीसोबत मागच्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब ज्यावेळी शेराला समजली. त्यावेळी त्याने गितेशला समजावण्याचा प्रयत्न केला होता. बायकोपासून लांब राहण्यास सांगितलं. मात्र, गितेशची काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
कोयत्याने गळ्यावर 11 ते 12 वार
view commentsशेरा मलिक आपल्याला ठार मारेल, या भीतीने गितेशने शेराच्या हत्येचा कट रचला. या कामात गितेशने त्याचा मित्र भोजराज कुंभारेची मदत घेतली. मुख्य आरोपीनं भोजराज याला शेरा मलिकची माहिती काढण्याचे काम सोपवले. भोजराजने शेरा घरी असल्याची खबर दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी शेराच्या घरी गेले. त्यांनी शेरा याला घराबाहेर बोलावले. यावेळी आरोपींच्या मनात काय सुरू आहे, याची पुसटशी कल्पनाही शेराला नव्हती. तो घराबाहेर येताच आरोपींनी त्याच्या गळ्यावर कोयत्याने 11-12 वार केले. शेरा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
April 22, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
घराबाहेर बोलवलं अन् कोयत्याने गळ्यावर केले 12 वार, नागपुरात प्रेयसीच्या पतीला दोघांनी दिला भयंकर मृत्यू


