हिंगोली हादरलं! शेतात बोलवून मित्राच्या मदतीने केला घात, सख्खा भाऊच निघाला वैरी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Hingoli : हिंगोलीत सख्ख्या भावानं आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या केली आहे.
मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली: हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्खा भावाची हत्या केली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीनं भावाची हत्या केल्यानंतर, स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ हरवल्याची तक्रार दिली. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी आरोपीचं बिंग फोडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावासह त्याच्या मित्राला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
हरिभाऊ किसन खोडके असं आरोपी भावाचं नाव आहे. तर शिवाजी किसन खोडके असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे. दोघंही हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके इथं राहत होते. आरोपी हरिभाऊ खोडके यानं आपल्या वडिलोपार्जित संपत्ती वाटा राहू नये, म्हणून आपल्या लहान भावाला संपवलं आहे. घटनेच्या दिवशी आरोपीनं कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलावून घेतलं होतं. भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीनं मित्र पवन आखाडे याच्या मदतीने भावाची गळा दाबून हत्या केली.
advertisement
यानंतर दोन्ही आरोपींनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तरहत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार दिली. पण २३ वर्षांचा मुलगा अशाप्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांना शोध आला. त्यांनी शिवाजी याला विविध ठिकाणी शोध घेतला. यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील एका खड्ड्यात पुरल्याचं आढळून आलं.
advertisement
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे याच्याविरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. वडिलोपार्जित संपत्तीत वाटा राहू नये म्हणून आरोपीनं ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
December 15, 2024 12:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
हिंगोली हादरलं! शेतात बोलवून मित्राच्या मदतीने केला घात, सख्खा भाऊच निघाला वैरी