डॉक्टर बायकोच्या चारित्र्यावर संशय होता, खून करून नवरा पसार, पोलिसांसमोर रडण्याचे नाटक पण...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nagpur Murder News: नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर अर्चना राहुले यांची हत्या त्यांच्या नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून केली.
नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अर्चना राहुले (वय 50 वर्ष) यांची हत्या त्यांच्या पतीने भावाच्या मदतीने केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून डॉ अनिल राहुले (52 वर्ष) यांनी भाऊ राजूसोबत (59 वर्ष) मिळून कट रचून डॉ. अर्चना यांची हत्या केली. डॉ अनिल यांनी भावाच्या मदतीने रॉडने वार करून डॉक्टर पत्नीचा खून केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर लेआऊट येथे ही हत्येची घटना घडली.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांना अटक केलीय. डॉ अर्चना या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर त्यांचे पती अनिल हे छत्तीसगड येथील रायपूर येथे मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा मुलगा तेलंगणा येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे.
डॉक्टर बायकोच्या चारित्र्यावर संशय होता, दोघांमध्ये टोकाचे वाद झाले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ अनिल हे अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून अर्चना आणि अनिल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यातूनच अनिलने भाऊ राजूच्या मदतीने अर्चनाच्या हत्येचा कट रचला.
advertisement
मयत अर्चना यांचे पती अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. ते आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत असतात. बाकी दिवस ते रायपूरमध्ये राहून नोकरी करतात. पण मागच्या काही काळापासून अर्चना यांचे बाहेरील एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल यांना होता. याच कारणातून ही हत्या केल्याचे आरोपीने सांगितले.
खून करून गायब झाला, पोलिसांसमोर रडण्याचे नाटक
advertisement
अनिल भावासह 9 एप्रिलला घरी आला. त्या दोघांनी रॉडने अर्चनाच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली आणि घराला लॉक लावून तेथून पसार झाले. 13 तारखेला रात्री घरी परत आले. जणू आपल्याला काही माहिती नसल्याचे बनाव करत अर्चनाचा मृतदेह पाहून रडायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना पती अनिलवर संशय आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अनिलने भावाच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचे कबुल केले.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
April 14, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
डॉक्टर बायकोच्या चारित्र्यावर संशय होता, खून करून नवरा पसार, पोलिसांसमोर रडण्याचे नाटक पण...


