advertisement

Cyber Fraud: बनावट कोर्ट अन् बोगस सीबीआय, निवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट, नाशिकमध्ये खळबळ

Last Updated:

Cyber Fraud: नाशिकमध्ये बनावट कोर्ट तयार करून बोगस सीबीआय अधिकाऱ्यांनी 83 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट केली. तसेच त्यांच्याकडून 30 लाखांची फसवणूक केलीये.

Cyber Fraud: बनावट कोर्ट अन् बोगस सीबीआय, निवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट, 30 लाखांना लुटले
Cyber Fraud: बनावट कोर्ट अन् बोगस सीबीआय, निवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट, 30 लाखांना लुटले
नाशिक: नाशिकमधील सायबर गुन्हेगारांनी 83 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला बनावट सीबीआय कार्यालय आणि सुप्रीम कोर्ट सेट तयार करून 30 लाख रुपयांची फसवणूक केली. त्यांनी व्हॉट्सअॅपवर खोटे फोटो, कोर्ट ऑर्डर आणि न्यायमूर्ती भूषण गवईंच्या भूमिकेत व्यक्ती दाखवून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची भीती निर्माण केली. हा प्रकार 17 ते 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडला, ज्यात निवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून ऑनलाइन पैसे हस्तांतरित करायला भाग पाडले.
अशी केली फसवणूक
फसवणूक करणाऱ्यांनी प्रथम फिर्यादीच्या मोबाइल सिमकार्डद्वारे अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा खोटा संदेश पाठवला. तसेच मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेची भीती घातली. पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत व्हिडिओ कॉलवर न्यायालयीन सुनावणी करणार असल्याचे सांगितले. खोटी कोर्ट ऑर्डर व्हॉट्सअॅपवर पाठवली. सायबर पोलिस ठाण्यातील निरीक्षक संजय पिसे यांच्या माहितीनुसार, 9 दिवसांपर्यंत ही फसवणूक चालू होती.
advertisement
सुप्रीम कोर्ट, सरन्यायाधीशांचा फोट फिर्यादीला पाठवून त्याला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले. तसेच त्यांना 30 लाख रुपये ऑनलाईन पाठवयला भाग पाडले. फिर्यादीला फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाणे गाठले, जिथे तक्रार दाखल करण्यात आली. नाशिक सायबर पोलीस याप्रकरणी तपास करीत असून, सायबर भामट्यांचा शोध सुरू आहे.
advertisement
दरम्यान, नाशिकमध्ये अशाच प्रकारचा प्रकार यापूर्वी देखील घडला होता. सर्वोच्च न्यायालायाची भीती दाखवत डिजिटल अरेस्ट करून वृद्धांकडून सुमारे 6.72 कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Cyber Fraud: बनावट कोर्ट अन् बोगस सीबीआय, निवृत्त अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट, नाशिकमध्ये खळबळ
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement