पुण्यात मध्यरात्री थरार! जावयाची सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण, भिंतीवर आदळलं डोकं, वादाचा भयंकर शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
जावयाने सासूला शिवीगाळ करत मारहाण केली. तिचं डोकं भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला
पुणे : अत्यंत क्षुल्लक कारणावरून जावयाने आपल्या सासूवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कासारवाडी परिसरात घडली आहे. कारमध्ये बसून न दिल्याच्या रागातून संतापलेल्या जावयाने सासूला शिवीगाळ करत मारहाण केली. तिचं डोकं भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (२६ नोव्हेंबर) मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.
याप्रकरणी आरोपी अमित बाळासाहेब पिसाळ (वय ३६, रा. कासारवाडी) याला दापोडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या सासूबाई यांनी या घटनेबाबत दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आपल्या मुलीला भेटण्यासाठी कासारवाडी येथे कारने गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी अमित पिसाळ याच्या भावाला आणि मित्रांना महिलेनं आपल्या कारमध्ये बसण्यास नकार दिला. हाच राग अमित पिसाळ याच्या मनात होता.
advertisement
मध्यरात्री या कारणावरून संतापलेल्या जावयाने सासूशी वाद घातला आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ केल्यानंतर त्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने महिलेचं डोकं भिंतीला आपटलं आणि तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपीला दापोडी पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ला आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. जावयाने सासूवर केलेल्या या विचित्र आणि भयंकर हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 28, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात मध्यरात्री थरार! जावयाची सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण, भिंतीवर आदळलं डोकं, वादाचा भयंकर शेवट


