पाकिस्तानमध्ये चाललंय काय? आणखी एका इनफ्लुएन्जरचं MMS कांड, प्रायव्हेट Video लिक

Last Updated:

पाकिस्तानमध्ये सध्या लोकप्रिय सेलिब्रिटींसाठीची वेळ चांगली नाहीये, असंच म्हणावं लागेल. कारण या सेलिब्रिटींचे प्रायव्हेट व्हिडिओ एका मागोमाग एक व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानमध्ये चाललंय काय? आणखी एका इनफ्लुएन्जरचं MMS कांड, प्रायव्हेट Video लिक
पाकिस्तानमध्ये चाललंय काय? आणखी एका इनफ्लुएन्जरचं MMS कांड, प्रायव्हेट Video लिक
लाहोर : पाकिस्तानमध्ये सध्या लोकप्रिय सेलिब्रिटींसाठीची वेळ चांगली नाहीये, असंच म्हणावं लागेल. कारण या सेलिब्रिटींचे प्रायव्हेट व्हिडिओ एका मागोमाग एक व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी इनफ्लुएन्जर कंवल आफताब, मिनााहिल मलिक, मथिरा मोहम्मद आणि इमशा रहमान यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीचा व्हिडिओ लिक झाला आहे. टिकटॉक स्टार मरियम फैसलचा कथित प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फैसलसोबत जोडल्या जात असलेल्या या व्हिडिओमद्ये एक मुलगी एका व्यक्तीसोबत रोमॅन्टिक क्षण घालवत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमधली महिला फैसल असल्याचा दावा अनेक जण करत आहेत, पण या दाव्यांबाबत अजून कोणाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
कंवल आफताबचा अश्लिल व्हिडिओ
ऑक्टोबर महिन्यानंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा अशाप्रकारे प्रायव्हेट व्हिडिओ लिक व्हायची ही पाचवी घटना आहे. मागच्या आठवड्यातही अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये कंवल आफताबला आक्षेपार्ह अवस्थेमध्ये दाखवण्यात आलं होतं. 26 वर्षांची कंवल आफताब सौंदर्य, लाईफस्टाईल आणि कुटुंबासंबंधी कंटेट बनवते. कंवल आफताबने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंवल आफताब लाहोरमध्ये राहते आणि इस्टाग्रामवर तिचे 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आफताबचं लग्न टिकटॉक स्टार जुल्करैन सिंकदरसोबत झालं असून त्यांना एक मुलगीही आहे.
advertisement
मथिराचा कथित व्हिडिओ लिक
पाकिस्तानी टीव्ही होस्ट आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्जर मथिरा मोहम्मदचाही एक कथित प्रायव्हेट व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यात लिक झाला होता. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या 32 वर्षांच्या मथिराने याप्रकरणी एफआयएकडे तक्रारही केली होती. माझं नाव आणि माझ्या फोटोशूटमधल्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. जरा तरी लाज बाळगा, मला यापासून लांब ठेवा, अशी पोस्ट मथिराने केली होती. त्याआधी पाकिस्तानी इनफ्लुएन्जर इमशा हरमानचाही एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ती आपत्तीजनक स्थितीमध्ये होती, यानंतर इमशाने तिचं सोशल मीडिया अकाऊंट लिक केलं.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पाकिस्तानमध्ये चाललंय काय? आणखी एका इनफ्लुएन्जरचं MMS कांड, प्रायव्हेट Video लिक
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement