मुलीसोबत ट्रेनमध्ये चढला तरुण; GRP ने विचारलं - कोण आहात दोघं? सत्य समजताच कोचमध्ये खळबळ

Last Updated:

एक तरुण 4 वर्षाच्या निष्पाप मुलीला चोरून तिला विकायला नेत होता. मोतिहारी जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने तरुणाला पकडण्यात आलं

4 वर्षाच्या मुलीला चोरलं
4 वर्षाच्या मुलीला चोरलं
पाटणा : मिथला एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक मुलगी जोरात ओरडायला लागली की, 'हा तरुण माझा कोणीही नाही, तो मला जबरदस्तीने घेऊन जात आहे.' यानंतर एकच खळबळ उडाली. एक तरुण 4 वर्षाच्या निष्पाप मुलीला चोरून तिला विकायला नेत होता. मोतिहारी जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने तरुणाला पकडण्यात आलं. ही मुलगी बंजारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिसवा पश्चिम गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
बंजारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिसवा पश्चिम गावातील एक मुलगी घरात झोपली होती. त्यानंतर रात्री उशिरा एक तरुण घरात घुसला. ज्याचं नाव लक्ष्मी प्रसाद उर्फ ​​विकी असल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणाने घराचा दरवाजा उघडून आत झोपलेल्या मुलीला उचलून पळ काढला. सकाळी आपली मुलगी बेपत्ता असल्याचं कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर सर्वजण हैराण झाले आणि नंतर बंजारिया पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
advertisement
याची माहिती मिळताच बंजारिया पोलीस ठाण्याने मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर मोतिहारी रेल्वे स्टेशनला एक माहिती मिळाली. हे कळताच सर्वांनाच धक्का बसला. मोतिहारी रेल्वे स्टेशनला माहिती मिळाली की रक्सौलहून हावरा येथे जाणाऱ्या मिथला एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक व्यक्ती एका मुलीला घेऊन जात आहे. मुलगी जोरजोरात रडत 'हा तरुण माझा कोणी नाही, तो मला जबरदस्तीने सोबत घेऊन जात आहे' असं म्हणत आहे.
advertisement
त्यानंतर जीआरपीने सापळा रचून आरपीएफच्या मदतीने तरुणासह मुलीला मेहसी स्थानकात उतरवलं. त्यानंतर दोघांना मोतिहारी येथे आणण्यात आलं. चौकशीदरम्यान मुलीने बंजारिया पोलीस स्टेशन हद्दीत तिचं घर असल्याचं सांगितल्यावर जीआरपीने मोतिहारी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर हा तरुण शेजारील गावातील असल्याचं समोर आलं. सुगौली स्टेशनवरून कोलकत्याला मिथला एक्स्प्रेसमध्ये तो मुलीला चोरून नेत होता. कदाचित तो तिला विकण्याच्या उद्देशाने घेऊन जात होता. मात्र, आता मोतिहारी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे. यासोबतच जीआरपीने बालचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तरुणालाही पुढील कारवाईसाठी बंजारिया पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मुलीसोबत ट्रेनमध्ये चढला तरुण; GRP ने विचारलं - कोण आहात दोघं? सत्य समजताच कोचमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Maharashtra Winter Session: भाजपच्या गुगलीने मविआची विकेट पडणार? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

View All
advertisement