हिंदी बोलणं पडलं महागात, 2 तरुणांना अटक करून टाकलं तुरुंगात; नेमकं प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
विमानतळावर आलेल्या या प्रवाशांना ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. या प्रवाशांनी त्याची हिंदी भाषेत उत्तरं देताच इमिग्रेशन अधिकाऱ्याला धक्काच बसला.
नवी दिल्ली : भारतात वेगवेगळी राज्य आहेत, जिथं वेगवेगळी भाषा बोलली जाते. पण हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा. देशात कुठेही गेलात तर तिथली भाषा येत नसली तरी हिंदी भाषा तुम्ही बोलू शकता. असं असताना भारतातच हिंदी बोलणं 2 जणांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावर घडलेला हा प्रकार. आता हे नेमकं प्रकरण काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले दोन तरुण. तिथं ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. चौकशीत आयबी अधिकाऱ्यांना त्यांना काही प्रश्न विचारली. या प्रश्नांची उत्तरं हिंदीत देण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आणि इथंच ते फसले. या दोघांनाही ताब्यात घेऊन बराच वेळ त्यांची चौकशी करण्यात आली. नंतर त्यांना IGI विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या तक्रारीवरून आयजीआय विमानतळाने या दोघांना अटक केली आहे.
advertisement
भारतातून बांगलादेशला जाणाऱ्या प्रवाशाला अटक
हे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबेदिर रहमान हा प्रवासी एअर इंडियाच्या एआय-237 विमानाने ढाकाला जाण्यासाठी आयजीआय विमानतळावर पोहोचला होता. चेक-इन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो पासपोर्ट आणि व्हिसा तपासण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या काउंटरवर पोहोचला. तपासादरम्यान इमिग्रेशन अधिकाऱ्याला पासपोर्टवर त्या व्यक्तीचं नाव ओबेद्दीन असल्याचं आढळलं. तर बायोडेटामध्ये उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रिधौरा गावाचा पत्ता नमूद करण्यात आला आहे.
advertisement

खांद्यावर बॅग घेऊन दररोज मध्यरात्री 3 वाजता हे दोन्ही तरुण एकाच रेल्वे स्थानकावर असायचे. एक दिवस रेल्वे पोलीस त्यांच्याजवळ गेली आणि त्यानंतर काय घडलं ते पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
हिंदी भाषेत बोलणं पडलं महागात
नेहमीच्या पद्धतीनुसार इमिग्रेशन अधिकारी ओबेद्दीनला काही प्रश्न विचारू लागले. या प्रश्नांची उत्तरे ओबेद्दीननं हिंदी भाषेत देण्याचा प्रयत्न केला. फक्त हा प्रयत्न त्याला महागात पडला. ओबेद्दीनचं हिंदी बोलणं ऐकून इमिग्रेशन अधिकाऱ्याला खात्री पटली की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरू करण्यात आली. सुरुवातीला ओबेद्दीनने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही प्रश्नांनंतर तो फसला.
advertisement
आरोपी प्रवासी बांगलादेशी नागरिक
विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबेद्दीनने इमिग्रेशन अधिकाऱ्याला सांगितलं की तो बांगलादेशी नागरिक आहे. तो मूळचा बांगलादेशातील बेरहामगंजचा रहिवासी आहे. चौकशीत त्याने परदेशात जाण्यासाठी अवैधरित्या भारतीय पासपोर्ट मिळवल्याचं कबूल केलं. चौकशीदरम्यान, इमिग्रेशन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ताब्यातून बांगलादेशी पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रही जप्त केलं. या खुलाशानंतर इमिग्रेशन ब्युरोने आरोपी ओबेद्दीनला आयजीआय विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
advertisement
हिंदीमुळे फसला असाच आणखी एक प्रवासी
view commentsआयजीआय विमानतळावर हिंदी भाषिक शैलीच्या आधारे प्रोफाइलिंगचे हे पहिलं प्रकरण नाही. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मॉस्कोहून आयजीआय विमानतळावर आलेल्या बाबुती बरुआ नावाच्या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली होती. बाबुतीच्या ताब्यातून अर्का बिस्वासच्या नावाने जारी केलेला भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. या पासपोर्टवर तो मॉस्को ते दिल्ली विमानतळावर गेला होता. त्याचवेळी ओबेद्दीनने भारतीय पासपोर्ट कोणाच्या मदतीने मिळवला हे शोधण्याचा प्रयत्न आता आयजीआय विमानतळ पोलीस करत आहेत.
Location :
Delhi
First Published :
August 03, 2024 8:24 AM IST










