मध्यरात्री 3 वाजता रेल्वे स्टेशनवर होते 2 तरुण; GRP ने तपास करताच समजलं ते शॉकिंग

Last Updated:

पहाटे तीनच्या सुमारास अजमेर रेल्वे स्थानकावर दोन तरुण येत होते. तिथं थोडावेळ थांबून दोन्ही तरुण घरी जात होते. त्यांची झडती घेतली असता जीआरपीलासुद्धा धक्का बसला,

रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री काय करत होते तरुण?
रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री काय करत होते तरुण?
अशोकसिंग भाटी, प्रतिनिधी/अजमेर :  दररोज किती तरी लोक रेल्वेने प्रवास करतात. दिवसभर रेल्वे स्टेशनवर गजबजाट असतो. मध्यरात्री काही तास काही रेल्वे स्टेशन्स शांत असतात तर काही रेल्वे स्थानकांवर तर शुकशुकाट असतो. अशाच एका रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री 3 वाजता दोन तरुण होते. जीआरपीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. जीआरपीनं त्यांचा तपास केला असतात धक्कादायक सत्य समोर आलं.
अजमेर रेल्वे स्टेशनवरील ही घटना. एक ट्रेन जयपूरला जात होती. ट्रेनमधील एक प्रवाशी रेल्वे स्थानकावर शौचालयात जाण्यासाठी उतरला. एची कोचमधून तो प्रवास करत होता. त्याची पत्नी त्यावेळी ट्रेनमध्येच होती. तिची पर्स गायब झाली. चोरट्यांनी तिची पर्स चोरली होती.
या प्रकरणाचा खुलासा करताना जीआरपी पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक राम अवतार चौधरी म्हणाले की, जयपूरचे रहिवासी योगेंद्र मेहरा यांनी 27 जुलै रोजी जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी सांगितं की ते ट्रेनने जयपूरला जात असताना अजमेर रेल्वे स्थानकावर शौचालयात उतरले होते, त्यावेळी एसी कोचमधील त्यांच्या पत्नीची पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
advertisement
पोलिसांनी चोरांना केली अटक
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. यानंतर दोन आरोपींची ओळख पटली. दोघंही अजमेरच्या गेगल पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत. पहिला आरोपी मुकेश सिंग रावत हा जिगल गावचा रहिवासी आहे तर दुसरा आरोपी पिंटू गुर्जर हा मोहनी गावचा रहिवासी आहे. दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळे गुन्हे केल्याची कबुली दिली.
advertisement
मध्यरात्री 3 वाजता करायचे चोरी
आरोपी पहाटे 3 वाजता अजमेर रेल्वे स्थानकावर यायचे. यावेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असतात. त्यामुळे स्थानकावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये घुसून मौल्यवान वस्तू ते चोरून नेत असत. ट्रेनच्या एसी डब्यांमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या बॅग, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू चोरत. दोन्ही आरोपींनी अशा 10 चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून तीन लॅपटॉप, लेडीज पर्स, रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
advertisement
दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अजमेर जीआरपी पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात 9 गुन्हे दाखल झाले असून 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मध्यरात्री 3 वाजता रेल्वे स्टेशनवर होते 2 तरुण; GRP ने तपास करताच समजलं ते शॉकिंग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement